• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भोंदूबाबा अशोक खरातचा नवीन प्रताप समोर, थेट परदेशात..; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

March 22, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील आध्यात्मिक गुरु आणि स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात उर्फ कॅप्टन यांचे अनेक काळे कारनामे एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.

Ashok kharat family tour (1)

अशोक खरातच्या तपासादरम्यान अशोक खरातच्या पूर्ण कुटुंबाचे फोटो समोर आले आहेत. खरातला दोन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब असून, त्याने आपल्या कुटुंबासह अनेक विदेशी दौरे केल्याचे उघड झाले आहे.

विशेषतः त्याच्या दक्षिण कोरियाच्या सहलीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो टी-शर्ट घालून मजामस्ती करताना दिसत आहे. एका बाजूला आध्यात्मिकतेचा आव आणणारा खरात दुसऱ्या बाजूला विलासी जीवन जगत होता, हे या फोटोंवरून स्पष्ट होत आहे.

Ashok kharat family tour (3)

अशोक खरातने केवळ दक्षिण कोरियाच नव्हे, तर इतरही अनेक देशांचे दौरे केले आहेत. एका सामान्य ज्योतिष प्रॅक्टिसपासून सुरू झालेला त्याचा प्रवास १०० कोटींच्या साम्राज्यापर्यंत कसा पोहोचला, याचा तपास आता विशेष तपास पथक (SIT) करत आहे.

Ashok kharat family tour (4)

या विदेशी दौऱ्यांसाठी पैसा कुठून आला? या दौऱ्यांमध्ये त्याच्यासोबत कोणकोणते बडे प्रस्थ होते? हे दौरे केवळ पर्यटनासाठी होते की यात काही आर्थिक गैरव्यवहार दडलेले आहेत? यांसह अनेक प्रश्नांची सध्या चौकशी सुरु आहे.

Ashok kharat family tour (5)

त्यासोबतच पोलीस आता खरातच्या पासपोर्ट आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीची कसून चौकशी करणार आहेत. अशोक खरातला एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे.

Ashok kharat family tour (6)

स्वतःला कृष्णाचा अवतार सांगून आणि महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांना त्याच्या कार्यालयातून आणि फार्म हाऊसवरून १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.

Ashok Kharat (1)

तपासादरम्यान एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि बड्या उद्योजकांसोबतचे त्याचे संबंध आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या भोंदू बाबाचे आणखी किती बळी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिलांसाठी आनंदाची बातमी! दरमहा 3000 रुपये मिळणार, अमित शहांची मोठी घोषणा
  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in