• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास कुठपर्यंत आला? मोठी अपडेट समोर

March 22, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता इतरही काही महिलांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

SIT चा तपास कुठपर्यंत आला?

समोर आलेल्या माहितीनुसार भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत, तसेच आणखी काही महिला पुढे येण्याच्या शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणे सुरू आहे.

माहिती गोळा करण्याचे काम सुरू

अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. तसेच कॅप्टन अशोक खरात यांच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे काम सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे. सर्व माहिती मिळाल्यानंतर पथकाकडून सविस्तर चौकशी केली जाणून असून त्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे.

नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात

नाशिक पोलिसांना अशोक खरात प्रकरणात काल मोठं यश मिळालं होतं. कॅप्टन खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो सध्या नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांच शाखेच्या ताब्यात आहे. नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. त्यामुळे आता त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. यातून अशोक खरातच्या आणखी कारनाम्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानचा वाईट काळ सुरु, इस्लामाबादवर कोसळणार मिसाइल्स?
  • 20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका
  • पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत भाजपकडून मित्रांचीच शिकार… रोहित पवारांनी दिली पक्की बातमी, म्हणाले
  • Maharashtra News LIVE : बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग, सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार
  • 19 व्या वर्षी कशी दिसायची जीनत अमान, 70 च्या दशकातील अभिनेत्रीचे 15 बोल्ड फोटो व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in