• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख

February 8, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. आपल्या आगामी ‘वध 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्या पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाल्या. करिअर, लग्न न करता मुलीला जन्म देणं आणि तिला लहानाचं मोठं करणं, लग्नाविषयी आई होण्याचा संघर्ष यांबद्दल नीना गुप्ता व्यक्त झाल्या. माजी क्रिकेचर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं अफेअर एकेकाळी जगजाहीर होतं. या दोघांना मसाबा ही मुलगी आहे. विवियन रिचर्ड्स यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नाही. त्यामुळे मुलीचं संगोपन नीना यांनाच करावं लागलं होतं. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘सिंगल मदर’ होणं हे ऐकायला जितकं क्रांतिकारी वाटतं, तितकंच खऱ्या आयुष्यात ते आव्हानात्मक आहे.

एकटीनेच मुलीचं संगोपन करणं काही सोपं नाही, त्यासाठी जबरदस्त हिंमत लागते आणि पावलोपावली तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागतो, हे नीना गुप्ता यांनी मान्य केलं. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “मी एक अभिनेत्री आहे आणि माझं काम असं आहे की मला शारीरिक रुपात सेटवर हजर राहावं लागतं. त्यावेळी माझ्यासमोर सर्वांत मोठा प्रश्न हाच होता की मी मुलीला कुठे सोडू? कोणाच्या भरवश्यावर सोडू? काम आणि बाळाच्या संगोपनामध्ये मी इतकी अडकली होती की मला पार्लर जायलाही वेळ नव्हता. तारुण्यात भावनेच्या भरात आपण काही निर्णय घेतो. मी याआधीही लोकांना सल्ला दिला आहे की नीना गुप्ताने केलं म्हणून तुम्हीसुद्धा करू नका. माझ्या आयुष्यातील हा सर्वांत कठीण निर्णयांपैकी एक होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

या मुलाखतीत काही हलक्याफुलक्या विषयांवर बोलताना नीना यांनी मजेशीर खुलासा केला. “मी माझ्या आयुष्यात फक्त दोनच लोकांना खूप घाबरते. एक देव आणि दुसरी माझी मुलगी मसाबा. मी मसाबाला खूप घाबरते. आजकालची मुलं अनेक गोष्टींमध्ये खूप पुढे गेली आहेत. सोशल मीडियावर मी काहीही पोस्ट करण्यासाठी शंभर वेळा विचार करते. कारण जर मसाबाला ती गोष्ट आवडली नाही तर ती मला लगेच डिलिट करायला सांगते आणि मी चुपचाप तिचं ऐकते”, असं त्यांनी सांगितलं.

1988 मध्ये नीना गुप्ता आई झाल्या होत्या. नीना आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी विवियन आधीच विवाहित होते. नीना गुप्तासाठी ते त्यांचं लग्न मोडायला किंवा घटस्फोट घ्यायला तयार नव्हते. त्यांनी नीना यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर बाळाला जन्म देण्याच्या निर्णयाची जबाबदारी त्यांनी नीना यांच्यावर सोपवली होती. तेव्हा नीना यांनी बाळाबद्दल मोठा निर्णय घेतला आणि एकल मातृत्व स्वीकारलं. 2008 मध्ये त्यांनी विवेक मिश्रा यांच्याशी लग्न केलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in