• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत पाकिस्तान सामन्यात मोबाईलचा वापर! सरफराज अहमदकडून नियमांचं उल्लंघन, आयसीसी देणार शिक्षा?

February 1, 2026 by admin Leave a Comment

U19 World Cup, Sarfaraz Ahmed: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोण धडक मारणार? याची उत्सुकता आहे. भारत पाकिस्तान सामन्यातून हे गणित सुटणार आहे. असं असताना या सामन्या दरम्यान व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे वादाला फोडणी मिळाली आहे. पाकिस्तान संघाचा मेंटॉर सरफराज अहमदच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. कारण लाईव्ह सामन्यात त्याने मोबाईल वापरल्याचं यात फोटो पाहून दावा केला जात आहे. सामना सुरू असताना मोबाईल फोनचा वापर करणं आयसीसी नियमांचं उल्लंघन मानलं जातं. सरफराज खानला या चुकीसाठी मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. कारण या व्हायरल फोटोनंतर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानचा अंडर 19 संघाचा मेंटॉर सरफराज अहमदला मोबाईल वापरण्याची परवानगी कोणी दिली? काही सोशल मिडिया युजर्संनी आयसीसी नियमांचा दाखला देत हा प्रश्न उपस्थित केला आहे.

भारत पाकिस्तान सामना सुरू असताना मोबाईलचा वापर केल्याने अनेक युजर्संनी तर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यास सुरूवात केली आहे. पण हा फोटो नेमका कुठचा आहे सांगणं कठीण आहे. हा फोटो पीएमओएच्या आतल्या आहे की बाहेरचा ते मात्र अस्पष्ट आहे. खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी मैदानात एक जागा ठरलेली असते. त्या जागेला पीएमओए म्हंटलं जातं. पीएमओएमध्ये संघ आणि सामना अधिकारी वापर करत असलेल्या जागांचा समावेश असतो. यात ड्रेसिंग रूप, संघ वापरत असलेले डगआऊट, पंच आणि सामनाधिकारी वापरत असलेले रूम, संघाकडून वापरल्या जाणाऱ्या खाण्याच्या जागा आणि आयसीसी अँटी करप्शन मॅनेजरकडून निर्धारित केलेल्या जागांचा समावेश असतो.

Questions are being raised about ICC protocol after Pakistan U19 mentor Sarfaraz Ahmed was spotted using a mobile phone during the match against India. With a strict ban on communication devices in the dressing room how was this permitted? 📱👀 #U19WorldCup #INDvPAK pic.twitter.com/Fgx4ctYkqN

— CaptainX (@heyCaptainX) February 1, 2026

पीएमोए जागेत एकरेडेशन कार्डशिवाय एन्ट्री मिळत नाही. हे कार्ड खेळाडू आणि कोचिंग स्टाफकडे असते. या भागात कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर करणं देखील नियमांचं उल्लंघन मानलं जातं. त्यामुळे सरफराज खानने मोबाईलचा वापर कुठे केला यावरून वाद होत आहे. जर त्याने पीएमओए भागात मोबाईल वापरला असेल तर त्याला नियम तोडल्याप्रकरणी मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच त्याच्यावर कारवाईही होऊ शकते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फेब्रुवारीत का येतो प्रेमाला बहर? जगभरात या महिन्याची क्रेझ का?
  • Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in