• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय हवामान विभागाचा थेट इशारा, महाराष्ट्रासह तब्बल इतक्या राज्यांमध्ये…

February 6, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला. काही दिवसांपूर्वीच थंडीचा कडाका बघायला मिळाला तर आता उकाडा जाणवत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील तापमानात दररोज मोठे बदल होताना दिसत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी काही भागात पाऊसही झाला. आता थंडी पूर्णपणे गायब झाली असून उकाडा जाणू लागला. राजस्थानच्या सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. सिकारमध्ये 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कोकणाती भिरा येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. भिरा येथे उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात जरी उकाडा जाणवत असला तरीही काही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागात दाट धुके पडेल. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरिणाया या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच केरळ आणि तामिळनाडूकरिता पुढील 24 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला. हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तीव्र थंडी जाणेल तर दुपारी उकाड्यापासून दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 6 फेब्रुवारी रोजी दिल्लीत अंशतः ढगाळ आकाश राहील. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आता दिल्लीमध्ये प्रदूषणात मोठ्या घट झाली. मुंबईसह दिल्लीतील वायू प्रदूषण मोठा मुद्दा बसले होते. विषारी हवा झाली होती.

डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी कायम राहिली. मात्र, जानेवारी महिन्यात थंडी उकाडा असे समीकरणे बघायला मिळाले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातून थंडी गायब झाल्याचे दिसतंय. मध्येच पाऊस येतो तर कधी उकाडा जाणवतो. आज दिवसभर राज्यात उकाडा जाणवेल. यासोबतच पावसालाही पोषक वातावरण राज्यात आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असूनही राज्यात शीतलहरी दाखल होत नाहीत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
  • Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..
  • Vaibhav Suryavanshi: चलो, समस्तीपूर, वैभव सूर्यवंशीने दामटली कार? सोशल मीडियावर Viral Video पाहिला का?
  • एकमेव साप जो घरट्यांमध्ये देतो अंडी, शेवटपर्यंत अंड्यांची करतो सुरक्षा, पण शेवटी…
  • 52 कोटींचे 194 कोटी करणारी ‘ती’ प्रसिद्ध अभिनेत्री अचानक झाली गायब, आज कुठे आणि कशी जगतेय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in