• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय वायू सेनेच्या Su-30MKI जेट फायटरचा रडारशी संपर्क तुटला, शोध मोहिम सुरु

March 6, 2026 by admin Leave a Comment


भारतीय वायुसेनेच्या एका सुखोई- ३० जेट फायटर विमानाचा अचानक रडारशी संपर्क तुटल्याची घटना आसाम येथील गुवाहाटी येथे घडली आहे. ही बातमी कळताच वायू सेनेची टीम विमानाचा शोध घेण्यासाठी घटना स्थळी गेली आहे. ही टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. या विमानाच्या लोकेशनचा शोध घेतला जात आहे. सध्या या जेट फायटरचा रडारशी संपर्क तुटण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

भारतीय वायू सेनेच्या एका सुखोई-३० फायटर जेट विमानाचा रडार यंत्रणेशी संपर्क तुटल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती गुवाहाटीच्या संरक्षण संपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. जोरहाट येथून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने या विमानाचा संपर्क रडार यंत्रणेशी तुटला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सुखोई-३० चा संपर्क तुटल्यानंतर वायू दलाच्या टीमना घटना स्थळी रवाना करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराची तपासणी वायू दलाचे पथक करत आहे. विमानाची लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणि व्यापर सर्च मोहिम सुरु करण्यात आलेली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही की रडार संपर्क नेमक्या कोणत्या परिस्थितीत तुटला. वायू सेना या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहे. या प्रकरणात सर्व एंगलने तपास करण्यात येत आहे, सुरक्षा एजन्सी आणि वायूसेनेचे अधिकारी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत. आणि या प्रकरणातील नेमक तथ्य समोर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

शेवटचा संपर्क

सुखोई-३० विमानाचा संपर्क नसल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आले. सायंकाली ७.४२ वाजता त्याच्या वैमानिकाशी शेवटचा संपर्क झाला होता. शोध आणि बचाव मोहिम सुरु असल्याचे हवाई दलाने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे. हे विमान आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात उड्डाण करत असताना त्याचा संपर्क रडार यंत्रणेशी तुटला.

सुखोई-३० लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये काय ?

भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान हे देशातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जात असून रशियाने हे विमान भारताला विकत दिले आहे. भारतीय वायू दलाच्या ताफ्यात सध्या अंदाजे २७२ सुखोई-३० एमकेआय विमाने आहेत आणि ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) द्वारे भारतात उत्पादित केली जातात. रशियाने २००२ मध्ये पहिले सुखोई-३० एमकेआय विमान भारताला विकत दिले होते. सुखोई हे दोन आसनी मल्टी-रोल लढाऊ विमान हवाई संरक्षण, जमिनीवर हल्ला आणि लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी उपयुक्त आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in