• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा

April 10, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे आखाती देशांमधून होणारा एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यात भरीस भर म्हणून युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यांनं भारतच नाही तर जगातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दरम्यान आता युद्धविरामाची घोषणा देखील झाली आहे. मात्र तरी देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केलेला नाहीये, एका दिवसात केवळ 15 च जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी इराणने दिली आहे. त्यामुळे जगावर अजूनही ऊर्जा संकट कायम आहे. आता अशा परिस्थितीमध्ये रशिया भारताच्या मदतीला पुन्हा एकदा धावून आला आहे.

मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. युद्धापूर्वी रशिया भारताला सवलतीच्या दरात तेल उपलब्ध करून देत होता. मात्र युद्ध सुरू असताना रशियानं भारताला सवलतीच्या दरात तेल निर्यातीस नकार दिला. कच्च्या तेलाच्या किंमती वाढवल्या. मात्र भारताला पाहिजे तेवढं तेल मिळेल असं रशियानं म्हटलं होतं. हा भारतासाठी एक प्रकारे मोठा दिलासाच होता. मात्र आता ऐन संकटाच्या काळात पुन्हा एकदा रशिया भारतासाठी धावून आला आहे.

मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे, मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना आता रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. रशिया भारताला तब्बल 40 टक्के सवलतीच्या दरात एलएनजी LNG चा पुरवठा करणार आहे. सध्या मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आधीच गॅसचा तुटवडा आहे, तसेच दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये रशियानं घेतलेला हा निर्णय भारतासाठी एक प्रकारे जॅकपॉटच म्हणावा लागेल, यामुळे भारतासारख्या देशांचा मोठा फायदा होणार आहे. कारण भारत हा ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबून आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in