• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान

April 13, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2011 मधील ICC Cricket World Cup 2011 दरम्यान झालेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत तब्बल 15 वर्षांनंतर तिने मौन सोडत त्या काळातील अनुभव उघड केला आहे. हा वाद केवळ चर्चेचा विषय नव्हता तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर मोठा परिणाम करणारा ठरला होता.

पूनम पांडेने सांगितले की, त्या काळात ती इंडस्ट्रीत नवीन होती आणि गोष्टी कशा हाताळायच्या याचा अनुभव तिला नव्हता. वाढदिवसाच्या दिवशी मित्रांसोबत असताना तिने सहजपणे एक वक्तव्य केले की, जर MS Dhoni यांच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ती ऑन-कॅमेरा कपडे काढेल. तिला तेव्हा हे एक साधं, मजेशीर वक्तव्य वाटलं. मात्र भारताच्या विजयासोबतच हे विधान मोठ्या वादात बदललं.

रातोरात मिळाली प्रसिद्धी

हे वक्तव्य व्हायरल होताच पूनम पांडे अचानक चर्चेत आली. ज्या लोकांना ती आधी माहितीही नव्हती तेही तिच्याबद्दल बोलू लागले. मात्र या प्रसिद्धीसोबतच तिला टीका, ट्रोलिंग आणि कायदेशीर नोटिसांचा सामना करावा लागला. तिने सांगितले की, अनेक कोर्ट केसेस झाल्यामुळे ती पूर्णपणे घाबरली होती.

वाद वाढल्यानंतर परिस्थिती सावरण्यासाठी तिने BCCI कडून परवानगी घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिला स्पष्ट नकार देण्यात आला. त्या काळात इंडस्ट्रीतील कामकाज, नेटवर्किंग आणि स्वतःची ओळख कशी निर्माण करायची याबाबत तिला फारशी माहिती नव्हती.

कुटुंबावर मोठा परिणाम

या संपूर्ण वादाचा सर्वाधिक परिणाम तिच्या कुटुंबावर झाला. पूनमने सांगितले की, तिने घरच्यांना याबाबत काहीही सांगितले नव्हते. तिच्या वडिलांना ही बातमी वर्तमानपत्रातून कळताच घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पारंपरिक कुटुंबातील असल्यामुळे समाजातील प्रतिमेची चिंता वाढली. पूनमने हेही उघड केले की, त्या काळात वडिलांच्या रागाचा सामना करावा लागला आणि घरातील वातावरण खूप तणावपूर्ण झाले.

आज 15 वर्षांनंतर ती या घटनेकडे एक शिकवण म्हणून पाहते. ती म्हणते की, त्या वयात योग्य-अयोग्य याची पूर्ण जाणीव नव्हती. आता मात्र तिला समजलं आहे की इंडस्ट्रीत टिकण्यासाठी संयम, समज आणि जबाबदारी किती महत्त्वाची असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकमेव समाज जिथे लग्नाचा सर्व खर्च नवरदेव करतो, खूपच वेगळी आहे परंपरा, कारण ऐकून….
  • SRH vs RR : राजस्थानचा हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, कोणती सलामी जोडी ठरणार ‘यशस्वी’?
  • मोठं संकट! अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, तब्बल इतके..
  • IPL 2026 स्पर्धेतील मुंबई विरूद्धच्या सामन्यात आरसीबीने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्या
  • IMD Monson Update : तीव्र उष्णता… पण पाऊस कमी की जास्त? हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने चिंता वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in