• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘भारताने वर्ल्डकप जिंकून क्रिकेट संपवलं’, शोएब अख्तर बरळला; तर शाहिद आफ्रिदीकडून स्तुतीसुमनं

March 9, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धु्व्वा उडवला. या सामन्यात न्यूझीलंडला कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. भारताने हा सामना एकहाती जिंकला. भारताच्या जेतेपदानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. दुसरीकडे, शेजारी पाकिस्तानात पोटदुखीची प्रकरणं वाढली होती. कारण भारताने जेतेपद मिळवलं हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शोएब अख्तरने टीम इंडिया गल्लीतील श्रीमंत मुलासारखी आहे. जो गरीब मुलांना सोबत खेळण्यासाठी घेतो आणि त्यांना हरवण्यासाठी खेळतो. इतकंच काय तर भारताने क्रिकेट संपवून टाकलं आहे.

शोएब अख्तरने पाकिस्तानातील एका मिडिया कार्यक्रमात सांगितलं की, ‘गल्लीत एक श्रीमंत मुलगा असतो. तो सर्व गरीब मुलांना बोलवतो आणि सांगतो क्रिकेट खेळायचं आहे. पण विजय फक्त माझाच असेल. असंच काहीसं भारत आमच्यासोबत करत आहे. पूर्ण क्रिकेट संपवून टाकलं.’ शोएब अख्तरला या माध्यमातून टीम इंडिया शक्तिशाली असल्याचं सांगायचं आहे. टीम इंडिया प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळवत आहे. त्यांच्याशी कोणी सामना करू शकत नाही असं दिसत आहे.

🚨 SHOAIB AKHTAR SUFFERS A MELTDOWN AFTER INDIA LIFTS T20 WORLD CUP

“India vo ameer bachcha jaisa hai jo mohalle ke saare ghareeb bachchon ko bula leta hai, ‘aao cricket khelein, jeetna sirf maine hai.”

😂😂 pic.twitter.com/iiBglYw2A0

— Brutal Truth (@sarkarstix) March 8, 2026

दुसरीकडे, टीम इंडियावर कायम टीकेची झोड उठवणाऱ्या शाहिदी आफ्रिदीनेही कौतुक केलं आहे. त्याने टीम इंडियाचं कॉम्बिनेशन आणि बेंच स्ट्रेंथ विजयास कारणीभूत असल्याचं सांगितलं. ‘टी20 वर्ल्डकप संपला आहे. भारत विजेता होण्यास पात्र होता. हा एक उत्तम संघ संयोजन होता आणि बेंचवरील मुलेही तितकीच चांगली होती. बेंच नेहमीच मजबूत असायला हवी. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत विजेत्यांसारखे खेळले.’

Shahid Afridi said:
“India deserved to win. 🇮🇳🏆 The Indian team played like true champions throughout the entire tournament.” 👏🔥#INDvsNZ pic.twitter.com/Hszi3wMiig

— Khan (@ccricket713) March 9, 2026

शाहिद आफ्रिदीने संजू सॅमसनचं कौतुक केलं. ‘सॅमसनला सलामीची संधी मिळाली आणि त्याने स्वतःला सिद्ध केले. त्याने हुशारीने फटकेबाजी केली आणि आपला डाव उभारला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.’ इतकंच काय तर बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा असल्याचं सांगितलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in