• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतातील अशा जागा जेथे पर्यटकांच्या प्रवेशाला असते बंदी, काय कारण ?

January 26, 2026 by admin Leave a Comment


1 – भारत अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जाण्यावर पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतू देशात काही जागा अशा आहेत जेथे जाण्यावर बंदी आहे. या क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक समुदायांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दिले आहे. ही ठिकाणे रहस्यमयी देखील आहेत. येथील निसर्ग, परंपरा आणि स्थानिकांच्या अधिकारांना प्राथमिकता दिली जाते.भारतातील चार अशी ठिकाणे येथे दिली आहे, जेथे पर्यटनाला मनाई आहे.

2 – जगातील सर्वात रहस्यमयी जागे पैकी एक नॉर्थ सेंटीनल आयलँड आहे. येथील सेंटिनलीज आदिवासींचा निवास आहे. या आदिवासी जमाती अजूनही जगाच्या पासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे भारत सरकारने या जमाती आणि बाहेर लोक अशा दोन्हींच्या सुरक्षेसाठी या बेटावर पर्यटकांवर संपूर्ण बंदी आहे. पर्यटक या बेटाला केवळ दुरुन पाहू शकतात.

3 – अमरनाथ यात्रेच्या वेळी भक्तांना गुहेपर्यंत जाण्यास परवानगी दिलेली असते. मात्र, गुहेतील काही भागात मात्र पर्यटकांना संपूर्ण मज्जाव आहे. या स्थानाला पवित्र मानले जात आहे. आणि धार्मिक महत्वामुळे सुरक्षेसाठी तसेच गर्दी नियंत्रणासाठी येथे प्रवेश मर्यादित असतो.

4 – सियाचिन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. येथे भारत-पाकिस्तानची सीमा असल्याने सुरक्षेसाठी हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. प्रतिकूल हवामान आणि सुरक्षासाठी पर्यटकांना येथे जाण्यास बंदी आहे. केवळ सैन्यदल आणि पूर्व परवानगी दिलेले संशोधकच येथे जाऊ शकतात.सियाचीन बेस कँपजवळ सिव्हील पर्यटन सुविधा सर्व सामान्य पर्यटकांसाठी खुली आहे मात्र येथे जाण्यासाठी विशेष परवानगी लागते.

5 – अरुणाचल प्रदेशात काही संरक्षित वनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेश प्रतिबंधीत आहे. या भागात आदिवासी गट आणि विलुप्तप्राय प्रजाती, सारखे दुर्लभ ऑर्कीड आणि वन्यजीवांचे संरक्षण करायचे आहे.पर्यावरण आणि आदिवासींच्या जीवनशैलीवर काही प्रभाव पडू नये यासाठी येथे जाण्यासाठी स्थानिय प्रशासनाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या
  • पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या
  • हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका
  • अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी
  • Sangli Car Accident | मद्यधुंद इनोव्हा चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in