• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताच्या मदतीला रशिया अखेर आला धावून, मोठा निर्णय, इराणच्या युद्धादरम्यानच…

March 13, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला इराणवर केला आणि युद्धाला सुरूवात झाली. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहण्याचे संकेत आहेत. मात्र, त्यापूर्वीच जगातील अनेक देश मोठ्या संकटात सापडली आहेत. इराणकडून आखाती देशांच्या तेल रिफायनरीवर हल्ले करण्यात आले. इराणच्याही तेल रिफायनरी अमेरिकेच्या आणि इस्त्रायलच्या टार्गेट होत्या. यामुळे मुळातच कच्च्या तेलाची आणि एलपीजी गॅसची कमी आहे. त्यामध्येच इराणकडून होर्मुज समुद्रीमार्ग बंद केला. जिथे हजारो जहाज अडकून पडले आहेत. तेलाची निर्यात आणि आयातच बंद झाली. यादरम्यान अमेरिकेने थेट भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली. भारतासाठी अजून मोठी आनंदाची बातमी आली आहे.

युद्धामुळे वाढलेल्या किंमतीदरम्यान अमेरिकेने मोठा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला. अमेरिकेने  रशियाचे कच्च्ये तेल आणि पेट्रोलियम उत्पादनावर लावलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. सध्या जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरल पोहोचल्या आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेलावर असलेले सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेचे वित्त विभागाचे विदेशी संपत्ती नियंत्रण कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, जनरल लाइसेंसच्या माध्यमातून सूट 11 एप्रिल 2026 पर्यंत असेल. ज्यामुळे आता भारतावरील एलपीजी गॅसची समस्या दूर होईल आणि भारतात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस दाखल होईल.  2022 मध्ये अमेरिका आणि G7 देशांनी रशियाच्या तेलावर प्राईप कॅप लावून निर्बंध लादले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीला सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांनी आता रशियावर घातलेले निर्बंध काढण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे जागतिक बाजारात वाढणाऱ्या तेलाच्या किंमती कमी होण्याचा अंदाज अमेरिकेचा आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे भारताचा देखील फायदा आहे. भारत थेट रशियाकडून खरेदी करू शकतो. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे संपूर्ण जग वैतागलेले असताना रशियाचा या युद्धात मोठा फायदा होताना दिसत आहे. भारतात एलपीजी गॅसचे संकट असताना भारताच्या मदतीला रशिया धावून आल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in