• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचे 100 रुपये इस्रायलमध्ये किती होतात? आकडा ऐकून धक्का बसेल

February 26, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 आणि 26 फेब्रुवारी असे दोन दिवस इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा इस्रायल दौरा दोन्ही देशांसाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आहे. इस्रायमध्ये भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं वास्तव्याला आहेत. तसेच दरवर्षी मोठ्या संख्येनं भारतीय पर्यटक इस्रायला भेट देण्यासाठी जात असतात. चला तर मग जाणून घेऊयात इस्रायलमध्ये भारताचे 100 रुपये किती होतात.

इस्रायलचं चलन हे खूप युनिक आहे. येथील चलनाला इस्रायली शेकेल असं म्हटलं जातं. इस्रायली शेकेल हे ILS कोडने दाखवले जातात. ज्या प्रमाणे भारती चलन दर्शवण्यासाठी INR चा वापर होतो, त्याचप्रमाणे इस्रायली शेकेल दाखवण्यासाठी ILS चा वापर होतो. शेकेल हा एक प्राचीन शब्द आहे. 1985 पर्यंत इस्रायलमध्ये जुन्या शेकेल चलनाचा वापार होत होता. मात्र इस्रायलमध्ये महागाई प्रचंड वाढली, त्यामुळे 1985 नंतर तेथील सरकारने नवं चलन अस्तित्वात आणलं ज्याला न्यू शेकेल असंही म्हटलं जातं. इस्रायली चलनावर तेथील प्रसिद्ध साहित्यकार, नेता, आणि शास्त्रज्ञ यांचे फोटो छापण्यात आले आहेत.

भारताचे 100 रुपये इस्रायलमध्ये किती होतात?

इस्रायलचं चलन भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच मजबूत आहे. भारताचे दहा रुपये इस्रायलमध्ये 0.34 इस्रायली न्यू शेकेल होतात, त्या हिशोबाने भारताचे 100 रुपये इस्रायलमध्ये 3.41 इस्रायली न्यू शेकेल इतके होतात. भारताच्या तुलनेत इस्रायली शेकेल हे अत्यंत मजबूत चलन आहे. इस्रायलचं चलन हे भारतापेक्षा मजबूत आहे, त्याचं महत्त्वाच कारण म्हणजे इस्रायची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. इस्रायलच्या तंत्रज्ञानाला जगभरात मोठी मागणी आहे, त्यामुळे तेथील चलन हे भारताच्या तुलनेत मजबूत आहे. एवढंच नाही तर मेडिकल आणि कृषी तंत्रज्ञानात देखील इस्रायलने मोठा विकास केला आहे, इस्रायलच्या कृषी तंत्रज्ञानाला देखील मोठी मागणी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in