• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचे मोठे टेन्शन मिठले, कतारने हात वर करताच आणि आता येथून एलएनजीचा होणार पुरवठा

April 12, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीए. मात्र, दोन आठवड्यांचा युद्धविराम झालेला आहे.दुसरीकडे पाकिस्तानात अमेरिका – इराण यांच्यादरम्यानच्या वाटाघाटी देखील अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे जागतिक संकट पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. इराण युद्धामुळे जगातील महत्वाचा होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग ठप्प झाल्याने जगातील अनेक देशात इंधन आणि गॅसचे संकट निर्माण झाले आहे. भारतावर होणाऱ्या इंधन टंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी आता सरकारचा प्लान – बी एक्टीव्ह झाला आहे. त्यामुळे केवळ आखाती देशच नव्हे तर अन्य मार्गानेही पुरवठा चालु केला आहे..

याच दरम्यान पीटीआयच्या बातमीनुसार अमेरिका आणि इराण युद्धादरम्यान भारताचा सर्वात मोठा एलएनजी पुरवठादार कतारने हात वर केले आहेत. तर या संकटाच्या समयी या सेक्टरची दिग्गज कंपनी शेल पीएलसी ( Shell PLC ) ने भारतासाठी दरवाजे उघडले आहेत. ग्लोबल एनर्जी कंपनीने पश्चिम आशियातील संकटात पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने भारताला एलएनजीचा पुरवठा वेगाने सुरु केला आहे.

भारतासाठी टॉप सप्लायर बनली कंपनी

Shell ने फर्टिलायजर्स सेक्टरच्या प्रमुक कंत्राटासह स्पॉट आणि टर्म डिमांडचा एक मोठा हिस्सा मिळवला आहे. गेल्या मार्च महिन्यात भारतीय फर्टिलायझर्स कंपन्यांच्या घाऊक एलएनजी खरेदीत शेल पीएलसी टॉप पुरवठादार म्हणून पुढे आली आहे. होर्मुझ स्ट्रेट बंद झाल्यानंतर आखाती देशातील एलएनजी पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे सरकारने युरिया उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी निविदा जारी केली होती.

या अंतर्गत शेलने एकूण ६ TBU (ट्रिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट) पैकी ४ TBU चा पुरवठा प्राप्त केला. केवळ फर्टिलायझर कंपन्याच नव्हे तर शेल इंडियाने अन्य इंडस्ट्रीयल युजर आणि रिटेल विक्रेत्यांना देखील गॅस पुरवठा केला आहे.

शेलकडे ६५ जहाजांचा ताफा

भारत आपल्या नैसर्गिक गॅसच्या गरजेपैकी जवळपास अर्ध्या हिस्सा आयातीद्वारा पूर्ण करतो. याचा उपयोग फर्टिलायझर प्रोडक्शन, एनर्जी प्रोडक्शन, ट्रान्सपोर्टेशनसाठी सीएनजी, घरातील पाईप्स गॅस ( पीएनजी ) च्या पुरवठ्यासाठी केला जाते. बातमीनुसार शेल कंपनीच्या जवळ ६५ हून जास्त चार्टर्ड जहाजांचा ताफा आहे.

या कंपनीने अशा वेळी गॅस पुरवठ्यात भारताची मदत केली आहे, की जेव्हा देशातील सर्वात मोठ्या एलएनजी पुरवठ्यादाराने मध्य पूर्वेतील संकटामुळे गॅस पुरवठ्यास थांबवण्याची घोषणा केली होती.

Middle East War युद्धाच्या सुरुवातीनंतर कतारच्या एनर्जी साईट्सवर हल्ला झाल्यानंतर कतारने मोठे पाऊल उचलत भारताच्या एलएनजी निर्यातीत ४० टक्क्यांपर्यंत कपात केली होती. कतार हा जगातील सर्वात मोठा नैसर्गित गॅस उत्पादन करणारा देश आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?
  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर
  • Asha Bhosle : आशाताईंचे ते शेवटचे गाणे..जे आता कधीच पूर्ण होणार नाही..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in