• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

March 16, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 16 दिवस असून, मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मजू स्ट्रेट बंद झाल्यामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या इंधन संकटात सापडलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या एकट्या सामुद्रधुनीमधून होते. दरम्यान त्यानंतर आता आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यमनच्या हुती बंडखोरांनी इराणच्या समर्थनार्थ बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही सामुद्रधुनी कोणत्याही वेळी आता हुती बंडखोरांकडून बंद करण्यात येऊ शकते. याबाबत बोलताना एका हुती बंडखोरांच्या वरिष्ठ कमांडरने म्हटलं आहे की, जर अमेरिका आणि इस्त्रायकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात आम्ही इराणची मदत करण्याचा निर्णय घेतला तर आमच्याकडे बाब अल-मंडेब स्ट्रेट बंद करणे हा मुख्य पर्याय असणार आहे. यामुळे आता भारताचं देखील टेन्शन वाढणार आहे.

बाब अल-मंडेब मार्ग भारतासाठी किती महत्त्वाचा

अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज स्ट्रेट यापूर्वीच बंद केला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हुती बंडखोरांनी बाब अल -मंडेब स्ट्रेट बंद केला तर भारताची समस्या अनेक पटींनी वाढू शकते. भारत या दोन मार्गाने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आणि गॅसची आयात करतो. अशा परिस्थितीमध्ये जरा वाहतुकीसाठी हे दोन्ही रस्ते बंद झाले तर भारतासमोर इंधन तुटवड्याचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज स्ट्रेट तर आधीपासूनच बंद आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यानं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, आणि आता जर हुती बंडखोरांनी बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद केली तर भारतासमोर असलेलं ऊर्जा संकट दुप्पट होण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. गॅसचा देखील तुटवडा निर्माण होऊ शकतो.

जगातील एकूण व्यापारापैकी जवळपास 12 टक्के आयात, निर्यात या मार्गाने होते. त्यामुळे हा मार्ग केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. जर हा मार्ग हुती बंडखोरांनी बंद केला तर संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणच्या एका इशाऱ्यावर आता हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in