• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताकडे येणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारे फोटो समोर

March 12, 2026 by admin Leave a Comment


सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचा थेट परिणाम भारतीय सागरी व्यापारावर आणि नागरिकांवर झाला आहे. थायलंडच्या मालकीचे मयुरी नारी (Mayuri Nari) या जहाजावर इराणने हल्ला केला आहे.

Mayuri Nari Cargo Ship 3

हे मालवाहू जहाज गुजरातच्या कांडला बंदराकडे येत होते. त्याचवेळी इराणने त्यावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा जागीच मृत्यू झाला असून, एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे.

Mayuri Nari Cargo Ship 6

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी नारी हे जहाज व्यावसायिक माल घेऊन अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशेने प्रवास करत होते.

Mayuri Nari Cargo Ship 9

आखाती देशांमधील (Gulf Region) तणाव वाढल्याने इराणने या भागातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या जहाजावरही हल्ला करण्यात आला.

Mayuri Nari Cargo Ship 8

या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जहाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यावरील यंत्रणा विस्कळीत झाली आहे. या हल्ल्याच्या वेळी जहाजावर अनेक भारतीय कर्मचारी तैनात होते. या भीषण घटनेची माहिती मिळताच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तातडीने सूत्रे हलवली आहेत.

Mayuri Nari Cargo Ship 7

युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी केंद्राने २४ तास कार्यरत असणारा विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तसेच बेपत्ता असलेल्या एका भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेतली जात आहे.

Mayuri Nari Cargo Ship 5

त्यासोबतच या जहाजावरील खलाशांना जवळील किनारपट्टीवर आणून त्यांना उपचारासाठी भरती करण्यात येत आहे. तसेच इस्रायल आणि दुबईमध्ये जखमी झालेल्या अन्य दोन भारतीय नागरिकांवर उपचार सुरू असून, सरकार त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Mayuri Nari Cargo Ship 4

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' आणि अरबी समुद्रातील व्यापारी मार्ग असुरक्षित बनले आहेत. भारताचा मोठा व्यापार या मार्गावरून होत असल्याने, या हल्ल्याचा परिणाम कच्च्या तेलाची आयात आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in