• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर… मोहन भागवत काय म्हणाले?

February 8, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त आरएसएसकडून  विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.  मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहोन भागवत यांनी विविध मुद्यांवर आपले विचार मांडले आहेत. भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजप सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न यावेळी मोहन भागवत यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपा सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का? तर हे उलट आहे.
आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. आम्ही अयोध्या, राम जन्मभूमी आंदोलन सुरु केलं, लोक जोडली गेली. लोकांना आमची भूमिका पटली, लोकांपर्यत पोहचणे आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं हे आमचं काम आहे, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

आमची शक्ती आहे, लोकं आमचं ऐकत असतील तर त्यांचा फायदा होतो.  त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले.  आम्ही भाजपवर कोणताही दबाव टाकला नाही,
आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही. आम्हला कुणी सल्ला मागितला तर सर्वांना मिळणार. त्यांचं पुण्य त्यांच्याकडे, त्यांचं पाप थोडं आमच्याकडे कारण ते आमच्याकडून गेले आहेत.  राजकारणत कुणाचाही दबाव नसतो, असेल तर तो मतदारांचा असतो, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ग्रहण असल्याने होळी कधी साजरी होणार? पंचांगानुसार जाणून घ्या
  • Gold Rate Prediction : वर्षभरात मोठं संकट, सोने, चांदीचा भाव असा वाढणार की.. नव्या भविष्यवाणीने सामान्यांची चिंता वाढली!
  • राज्यात पुन्हा वातावरण तापणार, 17 फेब्रुवारीपासून OBC आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा
  • भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख
  • भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर… मोहन भागवत काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in