• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..

March 26, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठी टीका केली. अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टी लाल टोपी आणि लाल सिलेंडरला घाबरत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची जी समस्या आणि मोठा तुटवडा आहे, यावर बोलताना दिसले. अखिलेश यादव यांनी म्हटले की, आज एक सामान्य माणूस एलपीजी गॅस मिळत नसल्याचे समस्येत आहे. पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, एलपीजीला लोक हारवलेला गॅस बोलत आहेत. सरकारवर थेटपणे टीका करताना त्यांनी म्हटले की, अगोदर बोरीनंतर चोरी. आता सरकारने फक्त चपातीची साईज छोटी करण्यास सांगू नये, म्हणजे झालं.

भारताच्या लोकांना मोठे स्वप्न दाखवण्यात आले 

इराण आणि अमेरिका युद्धाबद्दल बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारताच्या लोकांना मोठे स्वप्न दाखवण्यात आले होते की, आपण विश्वगुरू बनू. हे स्वप्न दाखवले गेले होते तर तु्म्ही लोकांना हे देखील दाखवायला हवे होते की, भारत हे युद्ध रोखू शकतो. पण तुम्ही हे बघितले की, कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय सरकारचे प्रमुख खासदार पाकिस्तानात उतरले.

तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले

सरकारला चिमटा काढत त्यांनी म्हटले की, तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले. जर तुम्ही इस्त्रायलवरून येताना इराणमध्ये थांबले असता तर युद्ध झाले नसते. विश्वगुरूच्या मुद्यावरून बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, तुमचे सर्व देशांसोबत संबंध चांगले आहेत पण भूमिका काय आहे? तुम्ही भूमिका असती तर युद्ध झाले नसते. जर खरोखरच तुम्ही विश्वगुरू असते तर युद्ध झाले नसते.

अखिलेश यादव यांचा अत्यंत गंभीर आरोप 

अमेरिकेने तुमच्यावर निर्बंध घातले. त्यावेळी तुम्हीही बोलू शकले असता जर युद्ध झाले तर आम्हीही अमेरिकेसोबत व्यापार करणार नाहीत. तुमचे परराष्ट्र धोरणही परकीय देशांकडून ठरवले जात आहे. याचा अर्थ आपल्या देशाला कुठेतरी ठामपणे उभा राहवे लागेल. जर सरकार काही चांगले निर्णय घेत असेल तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. पण कधीच विश्वगुरू बनण्याचा मुद्दा स्वीकार करणार नाहीत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?
  • Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in