• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडला कुणाची नजर लागली? आता रणवीर सिंहला धमकी; थेट व्हॉटसअपवर…

February 10, 2026 by admin Leave a Comment


Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘धुरंधर 2’ मुळे चर्चेत असतानाच त्याला एका गंभीर धमकीचा सामना करावा लागला आहे. रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवर वॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या फायरिंग घटनेनंतर रणवीर सिंहला ही धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर वॉइस नोट पाठवत थेट धमकी देत मोठ्या रकमेची मागणी केली आहे. या धमकीनंतर रणवीर सिंहने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

रणवीर सिंहच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा

धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी त्वरित हालचाली सुरू केल्या. रणवीर सिंहच्या घराबाहेर अतिरिक्त सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. वॉइस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. पोलिसांकडून धमकीची गंभीरतेने चौकशी सुरू असून कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीतील रहिवाशांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेल्या सशस्त्र सुरक्षा रक्षकांमुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटी प्रशासनाने याबाबत पोलिसांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. एका बाजूला अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला या वाढीव सुरक्षेमुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या दोन्ही घटनांमुळे मुंबईतील नामवंत कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रणवीर सिंहला आलेली धमकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेला गोळीबाराची घटना यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, रणवीर सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून धमकी देणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in