• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी, ‘देवदास’मध्ये शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचं निधन

March 6, 2026 by admin Leave a Comment


Vijay Crishna Death: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारणारे विजय कृष्णा यांनी विशेषतः देवदास या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली होती.

‘देवदास’ या चित्रपटात विजय कृष्णा यांनी शाहरुख खान वडिलांची ‘नारायण मुखर्जी’ ही भूमिका साकारली होती. पडद्यावर त्यांनी साकारलेली कडक आणि शिस्तप्रिय वडिलांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यांच्या अभिनयामुळे त्या भूमिकेला विशेष प्रसिद्धी प्राप्त झाले होती.

लिलिएट दुबे यांची भावनिक पोस्ट

विजय कृष्णा यांच्या निधनाची माहिती अभिनेत्री लिलिएट दुबे यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विजय कृष्णा यांचे काही फोटो शेअर करत भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मन खूप दुःखी झाले आहे. आमचे लाडके विजय कृष्णा जे 25 वर्षांहून अधिक काळ आमच्या थिएटर कुटुंबाचा आणि ‘डान्स लाइक अ मॅनचा भाग होते. आता आपल्यात नाहीत. ते बहुगुणी, प्रतिभावान, देखणे आणि त्यांच्या खास विनोदासाठी ओळखले जाणारे होते. ते सर्वांच्या मनात विशेष स्थान राखून होते. तसेच त्यांनी त्यांच्या पत्नी स्मिता, मुली नायरिका आणि फ्रेयान तसेच संपूर्ण कुटुंबीयांसाठी प्रार्थना व्यक्त केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lillete Dubey (@lilletedubeyofficial)

रंगभूमी ते चित्रपटसृष्टीतील प्रवास

विजय कृष्णा हे केवळ चित्रपट अभिनेते नाही तर भारतीय रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नाव होते. 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीवर सक्रिय काम केले. 2004 साली प्रदर्शित झालेल्या ‘डान्स लाइक अ मॅन’ या चित्रपटासाठीही त्यांना विशेष प्रशंसा मिळाली होती.

चित्रपट आणि रंगभूमीबरोबरच विजय कृष्णा हे पर्यावरणप्रेमी म्हणूनही ओळखले जात होते. ते Godrej Group या उद्योगसमूहात माजी कार्यकारी संचालक पदावरही कार्यरत होते.

पडद्यावर कडक वडिलांची भूमिका साकारणारे विजय कृष्णा प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अतिशय प्रेमळ आणि विनोदी स्वभावाचे होते असे त्यांना जवळून ओळखणारे सांगतात. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in