• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन, अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेले ब्लॉकबस्टर सिनेमे

March 15, 2026 by admin Leave a Comment


गेल्या दोन – तीन वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आता देखील हिंदी सिनेविश्वातील एक काळ गाजवलेल्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालं आहे. ‘सत्ते पे सत्ता’, ‘कर्ज’, ‘विश्वनाथ’ यांसारख्या दमदार सिनेमात भूमिका बजावलेल्या अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. मधू यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मधू यांनी महानायक अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांसारख्या सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केलेली. त्यांच्या अनेक सिनेमांना चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं.

मधू मल्होत्रा ​​बॉलिवूडमधील खूप कमी सिनेमांमध्ये दिसल्या, पण त्यांचे प्रत्येक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत आणि त्यांनी प्रसिद्ध आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. मधू यांनी 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम’, 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कर्ज’, आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्ते पे सत्ता’ सिनेमात काम केलं आहे. याशिवाय 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या, ‘संबंध’, ‘हीरो’, ‘रिश्ता कागज का’, ‘कयामत’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

मधू यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘कर्ज’ सिनेमात देखील काम केलं. ज्यामध्ये टीना अंबानी, सिमि ग्रेवाल, प्रेम नाथ यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारलेली होती… मधू यांनी ‘कर्ज’ सिनेमात सपोर्टिंग भूमिका साकारली होती. तर ‘सत्ते पर सत्ता’ सिनेमात मधू महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसल्या होत्या. यामध्ये अभिनेत्री हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केलेली.

सिनेमा निर्माते सुभाष घाई यांच्या ‘हिरो’ सिनेमातील ‘लंबी जुदाई’ गाण्यात मधू यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आजही हे गाणं अनेकांच्या लक्षात आहे… सुभाष घाई यांनी अभिनेत्रीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि श्रद्धांजली वाहताना त्यांचं “विनम्र महिला” असं वर्णन केलं आणि रेश्माने गायलेल्या या भावनिक गाण्यासाठी चेहरा आणि सुंदर डोळे असलेली अभिनेत्री शोधत असल्याने त्याने तिला गाण्यात कास्ट केल्याचे सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in