• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉयफ्रेंडने असं काय केलं ज्यामुळे युट्यूबर तरुणीनं संपवलं आयुष्य… मन सुन्न करणारी घटना

February 25, 2026 by admin Leave a Comment


Youtuber Girl Death: नात्यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. रिलेशनशिपमध्ये असताना प्रत्येक मुलगी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सुखी संसाराचे स्वप्न पाहत असते… पण त्या व्यक्तीसोबत काही गोष्टी बिनसल्यानंतर सर्वकाही संपल्यासारखं वाटतं… एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध युट्यूबर तरुणीसोबत देखील असंच काही झालं आहे… सोशल मीडियाच्या जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका युट्यूबर तरुणीन स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. 21 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याची बातमी समोर येत आहे… युट्यूबर तरुणीचं नाव कोमली असं आहे. कोमली हिच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे, तर युट्यूबर तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. संबंधित घटना हैदराबादमध्ये घडली. कोमली हैदराबादमधील मणिकोंडा परिसरातील चित्रपुरी कॉलनीमध्ये नातेवाईकांसोबत राहत होती.

कोमली हिच्या निधनाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, निखिल रेड्डी नावाच्या एका तरुणासोबत अभिनेत्रीचे प्रेमसंबंध होते… निखिल हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तोही युट्यूबवर सक्रिय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यापासून निखिल याने कोमली हिच्यापासून लांब राहण्यास सुरुवात केली होती. निखिल याच्यापासून दुरावा कोमली हिला सहन झाला नाही. म्हणून पूर्वी देखील तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला. पण कुटुंबियांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती सावरली होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं…

कुटुंबियांनी सर्व काही सावरल्यानंतर निखिल आणि कोमली यांच्यामध्ये लग्नावरुन खटके उडू लागले… लग्नाच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाल्याची देखील माहिती समोर आली आहे… या वादानंतर कोमली हिच्यावर असलेला तणाव आधिक वाढला… अशात सोमवारी घरी कोणीच नसताना कोमली हिने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपलं… सोमवारी घरात कोणीच नसताना कोमली हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर आईने रायडुर्गम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोमली हिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तर सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिला श्रद्धांजली देखील वाहिली आहे. आता पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in