• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘क्रांतीज्योती विद्यालय’चा बजेट किती? कमाईचा आकडा तिप्पट

January 23, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला आपलंसं केलं. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना थेट भिडल्या. राज्यभरातील अनेक शाळा आणि शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत सामूहिक शोज आयोजित केले आहेत. माजी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही चित्रपट पाहाताना दिसत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत बजेटच्या तिप्पट कमाई केली आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चा निर्मिती खर्च हा 6.50 कोटी रुपये असून या चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटी रुपयांच्या वर कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने मराठी माणसांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नव्यानं बळ दिलं आहे. मराठी माध्यम शाळांविषयी असलेली न्यूनगंडाची भावना दूर करत, ‘आपली शाळा, आपली भाषा आणि आपली ओळख’ याचा अभिमान पुन्हा जागा केला आहे. चित्रपट संपल्यानंतर दिसणारे टाळ्यांचे गजर, भारावलेले चेहरे आणि डोळ्यांतला विश्वास यावरूनच या चित्रपटाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. सकाळी 7 वाजताचा पहिला शो असो किंवा रात्री 12 वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपलं स्थान ठामपणे अधोरेखित केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “आम्ही हा चित्रपट करताना फक्त एक गोष्ट मनात ठेवली होती, मराठी शाळेची कथा प्रामाणिकपणे सांगायची. आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा चित्रपट पाहून जे बळ घेत आहेत, त्यातूनच मला वाटतं की, या सगळ्या जागृतीमुळे शिक्षण व्यवस्थेलाही याची जाणीव होईल. आपल्या मराठी शाळा टिकाव्यात, फुलाव्यात आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात, हीच एकमेव आशा आणि इच्छा या चित्रपटामागे होती.”

या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….
  • डुकाटीची आतापर्यंतची सर्वात हलकी व वेगवान सुपरबाइक लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल
  • करिअरमध्ये प्रगती हवी? मुलांक 4 असलेल्या व्यक्तींनी काय करावे?
  • मोठी बातमी! युद्धविरामानंतर ट्रम्प नव्या मोहिमेवर, आणखी एक युद्ध सुरू होणार? केली खळबळजनक घोषणा
  • पूजा करताना शंख का वाजवला जातो? काय आहे शास्त्रीय महत्त्व

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in