• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप तरी जिंकले 6 ऑस्कर, असं आहे तरी काय? OTT वर कुठे पाहू शकता हा चित्रपट?

March 17, 2026 by admin Leave a Comment


बाफ्ता, गोल्डन ग्लोब आणि आता ऑस्कर.. हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी अपयशी ठरला असला तरी त्याने बॅक टू बॅक मोठे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हा चित्रपट ॲक्शन आणि थ्रिलचा एक संपूर्ण पॅकेज आहे, जो प्रेक्षकांना 2 तास 42 मिनिटं खुर्चीवर खिळवून ठेवू शकतो. याची स्टारकास्ट दमदार असून चित्रपटाची कथा थक्क करणारी आणि अस्वस्थ करणारी आहे. या चित्रपटात एका वडील आणि मुलीची कथा सांगण्यात आली आहे जे त्यांच्या भूतकाळाच्या परिणामांशी झुंज देत असतात. वर्तमान त्यांचा आधीच कठीण आहे, परंतु भूतकाळाच्या सावल्या त्यांचं आयुष्य आणखी त्रासदायक बनवतात. ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलत आहोत त्याचं नाव आहे ‘वन बॅटल आफ्टर अदर’. या चित्रपटाचं दिग्दर्शन पॉल थॉमस अँडरसन यांनी केलं आहे. हा त्यांचा आतापर्यंतच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

या चित्रपटात लियोनार्डो डिकॅप्रिओ, सीन पेन, बेनिसियो डेल टोरो, रेजिना हॉल आणि तेयाना टेलर यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट एडाप्टेड स्क्रीनप्ले, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कास्टिंग या श्रेण्यांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बाफ्ता, गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर जिंकलेला हा चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं बजेट जवळपास 130 ते 175 दशलक्ष डॉलर इतका होता. जगभरात या चित्रपटाने फक्त 209 दशलक्ष डॉलरची कमाई केली. त्यामुळे फक्त बजेटचा खर्च त्यातून निघाला होता. ‘वन बॅटल आफ्टर अदर’ या चित्रपटात बॉबजी कहाणी दाखवण्यात आली आहे, जो एकेकाळी क्रांतिकारी असतो, परंतु भूतकाळातील काही घटनांमुळे तो आता व्यसनाधीन झालेला असतो. सगळ्या गोष्टींपासून दूर तो त्याच्या मुलीसोबत आपलं एकाकी आयुष्य जगत असतो. अशातच एकेदिवशी त्याचा एक जुना कट्टर शत्रू त्याच्या आयुष्यात परत येतो आणि त्याच्या मुलीचं अपहरण करतो.

तब्बल सहा ऑस्कर पुरस्कार जिंकलेला हा चित्रपट गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो ओटीटीवर स्ट्रीम होत आहे. सध्या तुम्ही हा चित्रपट जियो हॉटस्टारवर पाहू शकता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in