• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिनधास्त राहा, तुमच्याकडे गॅस सिलेंडर पोहोचणारच; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

March 13, 2026 by admin Leave a Comment


इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. याचे परिणाम जागतिक स्तरावर होताना दिसत आहे. इराण आणि इस्त्रायलच्या संघर्षामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट अखेर टळले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली की, देशातील व्यावसायिक गॅसचा पुरवठा आजपासून पूर्णपणे सुरळीत करण्यात आला आहे. तसेच, देशांतर्गत घरगुती वापराच्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात गॅसचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे सर्वत्र मागणीत अचानक वाढ झाली. यावर स्पष्टीकरण देताना मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भाष्य केले. देशातील ३३ कोटी कुटुंबांच्या, विशेषतः गरीब आणि वंचितांच्या स्वयंपाकघरात इंधनाची कमतरता भासू नये ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गेल्या पाच दिवसांत रिफायनरींद्वारे एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या पुढील खरेदी देखील सुरू आहे, असेही हरदीप सिंग म्हणाले.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद असूनही भारत सुरक्षित

जगातील महत्त्वाचा सागरी मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सध्या व्यावसायिक जहाजांसाठी जवळपास बंद आहे. पूर्वी भारताचे ४५ टक्के कच्चे तेल याच मार्गावरून येत होते. मात्र, भारताने अत्यंत मुत्सद्दीपणे आपला ७० टक्के पुरवठा इतर मार्गांवर वळवला आहे. भारत आता केवळ २७ देशांऐवजी ४० विविध देशांकडून कच्चे तेल आणि एलएनजी आयात करत आहे. ज्यात रशिया, अमेरिका, कॅनडा आणि नॉर्वे यांसारख्या देशांचा समावेश आहे, अशीही माहिती हरदीप सिंग यांनी दिली.

देशातील सर्व तेल शुद्धीकरण कारखाने सध्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. अनेक ठिकाणी ही क्षमता १०० टक्क्यांच्याही वर गेली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, केरोसीन किंवा एटीएफ (विमान इंधन) यांचा कोणताही तुटवडा नाही. सीएनजीचा पुरवठा देखील १०० टक्के सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले.

गॅसची काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई

एलपीजीवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्योग, हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला पुढील एका महिन्यासाठी बायोमास, आरडीएफ पेलेट्स आणि रॉकेल यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गॅस सिलेंडरबाबत लोकांनी घाबरून जाण्याची (Panic buying) गरज नाही, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे. केवळ भीतीपोटी मागणी वाढली असून पुरवठा साखळी सुरक्षित आहे. तसेच, परिस्थितीचा फायदा घेऊन गॅसची काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle : आशाताईंची ती इच्छा होणार पूर्ण, राज्य सरकारचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय!
  • बापरे! या अभिनेत्रीने 10 कोटींमध्ये बांधलेलं घर 100 कोटींना विकलं, घराचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल…
  • Asha bhosle | स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंचे अंत्यदर्शन
  • ओला इलेक्ट्रीकची नवीन ई-स्कूटर S1 X+ 5.2 kWh लाँच, रेंज आणि किंमत किती पाहा
  • श्वेता तिवारीला कोण म्हणेल 25 वर्षांच्या मुलीची आई, ग्लमरस लूक पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in