• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाबर आझमने टीम इंडियाच्या जर्सीवर केली स्वाक्षरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच…

December 30, 2025 by admin Leave a Comment

भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधांना गेल्या काही वर्षात तडा गेला आहे. आयसीसी आणि मल्टी नॅशनल स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडू हस्तांदोलनही करत नाहीत. त्यामुळे वाद किती टोकाचा आहे हे दिसून येतं. असं असताना बाबर आझमच्या एका कृतीने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या एका ऑटोग्राफने नव्या वादाला जन्म दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करू शकते. पाकिस्तानचा बाबर आझम ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे.बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत आहे आणि आतापर्यंत त्याची कामगिरी निराशाजनक आहे.चार सामन्यात फक्त 71 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर त्याचा स्ट्राइक रेट देखील 110 आहे. त्याच्या चारपैकी तीन डावांमध्ये तो दुहेरी आकडी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला आहे.

बिग बॅश लीग स्पर्धेदरम्यान बाबर आझमने टीम इंडियाच्या एका चाहत्याला ऑटोग्राफ दिला. पण या चाहत्याने टीम इंडियाची जर्सी परिधान केली होती. त्या जर्सीवरच बाबर आझमने ऑटोग्राफ दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. इतकंच काय तर त्या चाहत्यासोबत बाबर आझमने सेल्फीही घेतला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. कारण भारतीय संघाच्या जर्सीवर ऑटोग्राफ केल्याने संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना टीम इंडियाच्या जर्सीचा अपमान असल्याचं म्हंटलं आहे. इतकंच काय तर बाबर आझमला खडे बोलही सुनावले आहेत.

🚨Babar Azam meet an Indian fan and signed her jersey ❤ pic.twitter.com/0W9GNVmosi

— INAYAT (@Inayattttt_56) December 28, 2025

दरम्यान बाबर आझमला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघातून डावललं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान दोघेही खेळणार नाहीत. शादाब खान 15 सदस्यीय संघात परतला आहे. तर सलमान अली आगा संघाचे नेतृत्व करत आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा टी20 संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शादाब खान, उस्मान तारिक, मोहम्मद खान.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shreyas Iyer: श्रेयस अय्यरबाबत खेळणार की नाही? चाहत्यांची धाकधूक वाढली
  • WIND vs WSL : श्रीलंकेची पुन्हा धुलाई फिक्स! भारताची बॅटिंग, स्मृती मंधाना प्लेइंग ईलेव्हनमधून आऊट
  • शरद पवार NDA मध्ये सामील होणार, अदानी यांच्या मध्यस्थीने…बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ!
  • WPL 2026 स्पर्धेच्या 10 दिवसांआधी आरसीबीला धक्का, एलिस पेरीच्या निर्णयामुळे धावाधाव
  • BBL 2025-26: चौकार षटकार मारून ठोकल्या 80 धावा, शेवटच्या षटकात चूक झाली आणि नाबाद 99

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in