• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बस ड्रायव्हरचा मुलगा, अभिनेता होण्यासाठी 300 रुपये घेऊन घर सोडले, बनला सुपरस्टार, नेटवर्थ थक्क करणारी

January 8, 2026 by admin Leave a Comment


Kannada Actor Yash Birthday: साऊथ इंडस्ट्रीमधील वंडर बॉय आणि रॉकिंग स्टार म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार यश आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. यश केवळ कन्नड सिनेसृष्टीपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर त्याने बॉलिवूडसह संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या वाढदिवसाच्या खास दिवशी यशने चाहत्यांना मोठं गिफ्ट देत आपल्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चा दमदार टीझर रिलीज केला असून हा टीझर पाहून चाहते त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा असून त्याचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील भुवनहल्ली या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील बस ड्रायव्हर होते तर आई गृहिणी होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. मुलाने शिकून सरकारी नोकरी करावी अशीच त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती.

मात्र, यशची लहानपणापासूनच आवड ही अभिनयाकडे होती. शाळेत होणाऱ्या नाटकांमध्ये आणि नृत्यस्पर्धांमध्ये तो नेहमी भाग घ्यायचा. रंगमंचावर मिळणाऱ्या टाळ्यांनी त्याच्या मनात अभिनेता होण्याचं स्वप्न अधिक घट्ट केलं.

फक्त 300 रुपये घेऊन घर सोडण्याचा धाडसी निर्णय

यशच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय म्हणजे तो फक्त 300 रुपये घेऊन घर सोडून बंगळुरूकडे निघाला. त्याला वाटले की आपण परत गेलो तर आपल्याला अभिनेता होता येणार नाही. बंगळुरूला पोहोचल्यावर त्याने थिएटरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला त्याला बॅकस्टेजची कामं आणि लहान-मोठे रोल मिळाले. मात्र, कोणतंही काम असो त्याने ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केलं. हाच संघर्ष पुढे जाऊन त्याच्या यशाची पाया ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

किती आहे यशची नेटवर्थ?

‘केजीएफ: चॅप्टर १’मधील ‘रॉकी’ या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून चाहते देखील वेडे झाले. CAknowledge.com च्या रिपोर्टनुसार यशची नेटवर्थ ही 50 ते 60 कोटींच्या आसपास असल्याचे म्हटले जाते. त्याची वर्षभराची कमाई ही सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांमध्ये आहे.

‘टॉक्सिक’मधून पुन्हा एकदा धमाका करणार?

आता यश आपल्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. वाढदिवसाच्या दिवशी रिलीज झालेल्या या टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. यशचा हा नवा अवतार पाहून पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर इतिहास रचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका तिथेच पायघड्या! तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत घोषणांचा पाऊसच पाऊस
  • T20 World Cup आधी भारताच्या खेळाडूची कसोटी, 2 सामने खेळणार, कुणाविरुद्ध? जाणून घ्या
  • IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
  • GK : श्रीकृष्णाची सर्वात आवडती बासरी कोणती होती? एकदा वाचाच!
  • बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in