• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बदाम, चौकट, किल्वर, इस्पिक… पत्त्यांना कशी मिळाली ही नावं ? पुढल्यावेळेस खेळण्याआधी नक्की घ्या जाणून

March 26, 2026 by admin Leave a Comment


पत्ते खेळायला बहुतेक लोकांना आवडतं. पत्त्यांच्या कॅटमध्ये चार रंगाची पानं असतात , त्यापैकी दोन लाल आणि दोन काळी असतात. प्रत्येकाचा आकार वेगळा असतो आणि : बदाम (♥), चौकट (♦), किल्वर (♣), इस्पिक(♠) अशी त्याची नावं असतात. या खेळाचा इतिहासही खूप जुना आहे. असे म्हटले जाते की पत्त्यांचा खेळ सुमारे 15 व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाला आणि कालांतराने तो जगभर पसरला.

इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात? : परदेशात, हे चार पत्ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. हार्ट्स (♥) – लाल, डायमंड्स (♦) – चौकट, क्लब्स (♣) – किल्वर, स्पेड्स (♠) – इस्पिक. काही देशांमध्ये, चौकटला “टाईल्स” असेही म्हटले जाते, तर फ्रेंचमध्ये Hearts, Tiles, Clovers आणि Pikes यांसारखे शब्द वापरले जातात.

या नावांमागचा इतिहास काय ? : पत्त्यांचा उगम युरोपमध्ये झाला असे मानले जाते. सुरुवातीच्या काळात, वेगवेगळ्या देशांमध्ये पत्त्यांची रचना आणि अर्थ वेगवेगळे होते. इटालियन पत्त्यांच्या कॅटमध्ये तर 56 पत्ते होते, ज्यामध्ये प्याले, तलवारी, नाणी आणि काठ्या यांसारखी चिन्हे दिसत होती. त्यानंतर 15 व्या शतकात, फ्रान्समध्ये सध्याच्या पत्त्यांच्या प्रकारांना (हार्ट्स, डायमंड्स, क्लब्स, स्पेड्स) प्रोत्साहन मिळू लागले. यासोबतच, राजा, राणी आणि गुलाम यांसारखे दरबारी पत्ते देखील जोडले गेले.

भारतात ही नावं कशी आली ?: आता सर्वात रंजक प्रश्न असा की, भारतात बदाम, किल्वर, चौकट आणि इस्पिक ही नावं कशी पडली का आली? खरं तर, याचा कोणताही निश्चित पुरावा नाही. पण काही समजुतींनुसार: बदाम – कारण त्याचा आकार पानासारखा दिसतो, चौकट – कारण त्याची रचना फरशीसारखी आहे, इस्पिक – जे काळे पान म्हणून ओळखले जाते आणि कदाचित शक्ती किंवा आज्ञेचे प्रतीक मानलं जातं, तर शेवटचं किल्वर – कारण ते एक हलकं आणि साधं कार्ड आहे, त्याचा संबंध फुलांशी जोडला गेला. हा सर्व केवळ तर्क आणि लोकप्रिय सिद्धांत आहे, यामागे कोणतेही अधिकृत कारण नाही.

मनोरंजक तथ्य : ही नावं आज सामान्य वाटत असली तरी, ती काळाच्या ओघात लोकप्रिय झाली आहेत. लोकांनी आपापल्या भाषेनुसार आणि समजुतीनुसार या पत्त्यांना नावे दिली आहेत आणि आज हीच नावे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहेत. त्यामुळे, आता जेव्हा तुम्ही पत्ते खेळाल, तेव्हा या चार पत्त्यांमागे दडलेली ही मनोरंजक कथा तुम्हाला नक्कीच आठवेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in