• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुमच्या आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश

April 6, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणे हे प्रत्येकाचे प्राधान्य बनले आहे. कारण रोजच्या त्या धावपळीत अनेकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण डाएट करण्याचा निर्णय घेतात जेणेकरून योग्य पोषण आपल्या शरीराला मिळतील. परंतु योग्य आहाराबद्दल अजूनही खूप लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकं अनेकदा महागड्या सुपरफूड्स किंवा कठीण डाएट प्लॅन्सच्या मागे धावतात. तर तज्ञांचा असा विश्वास आहे की काही सोप्या गोष्टी शरीराला आतून मजबूत बनवू शकतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट यांच्या मते जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश केला तर तुमच्या शरीराच्या ऊर्जेत आणि जीवनशैलीत मोठी सुधारणा दिसून येऊ शकते. चला तर मग कोणते 5 गोष्टी आहारात समावेश करायचा ते जाणून घेऊयात.

आहारतज्ज्ञांच्या मते तुमच्या आहारात या ५ गोष्टींचा समावेश करा

1. क्रूसिफेरस भाज्या

ब्रोकोली, कोबी आणि फ्लावर यांसारख्या भाज्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यांमधील पोषक तत्वे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात. त्यांच्या नियमित सेवनाने शरीर शुद्धीकरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

2. बेरी

स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीसारख्या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावू शकतात. तसेच बेरीजचे सेवन त्वचा आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात.

3. ओमेगा-3 युक्त पदार्थ

ओमेगा-३ फॅटी ॲसिड हे अक्रोड, अळशी आणि तेलकट माशांमध्ये आढळतात. तर या पदार्थांचा समावेश आहारात केल्याने हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यांच्या नियमित सेवनाने दाह कमी होतो आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

4. मसाले

भारतीय खाद्यसंस्कृतीत वापरले जाणारे हळद, आले आणि दालचिनी यांसारखे मसाले नैसर्गिक दाहशामक घटक आहेत. ते शरीराला विविध आजारांपासून वाचवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. रोजच्या आहारात त्यांचा संतुलित वापर फायदेशीर ठरतो.

5. आरोग्यदायी फॅटस

तूप ऑलिव्ह तेल आणि सुकामेवा यांसारखे आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ शरीरासाठी आवश्यक आहेत. ते हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने ऊर्जा मिळते आणि एकूणच आरोग्य सुधारते.

निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या सवयींमध्ये छोटे बदल केल्याने तुम्हाला अधिक काळ तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..
  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in