• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट

April 9, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत जे आपल्या वेगळ्या शैलीमुळे खास ओळख निर्माण करतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे अमित त्रिवेदी. त्यांच्या संगीतामध्ये नेहमीच काहीतरी नवीन, प्रयोगशील आणि मनाला भिडणारा सूर असतो. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेली गाणी दिली असून आजही ते प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. मात्र, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो ‘देव डी’ या चित्रपटामुळे.

8 एप्रिल 1979 रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात अमित त्रिवेदी यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव गुजरातमधील अहमदाबाद आहे. लहानपणापासूनच त्यांच्या घरात भक्तीगीतं आणि लोकसंगीत यांचा माहोल होता. याच वातावरणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. शालेय जीवनातच त्यांना विविध वाद्यांबद्दल आवड निर्माण झाली आणि पुढे जाऊन त्यांनी संगीत क्षेत्रातच करिअर करायचे ठरवले.

संघर्षातून उभारलेली कारकीर्द

कॉलेजमध्ये असताना त्यांनी मित्रांसोबत ‘ओम’ नावाचा बँड स्थापन केला. या बँडच्या माध्यमातून त्यांनी छोटे-मोठे कार्यक्रम आणि लाईव्ह परफॉर्मन्स केले. सुरुवातीला त्यांना फारशी ओळख मिळाली नाही पण त्यांनी हार मानली नाही. सातत्याने प्रयत्न करत त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी थिएटर, टीव्ही शो आणि जाहिरातींसाठी संगीत दिले. अनेक कंपन्यांसाठी जिंगल्स तयार करत त्यांनी अनुभव मिळवला. हा काळ त्यांच्या शिकण्याचा होता, ज्यामध्ये त्यांनी संगीताच्या सूक्ष्म गोष्टी आत्मसात केल्या.

‘देव डी’मुळे मिळाली मोठी ओळख

2008 साली ‘आमिर’ या चित्रपटातून त्यांनी संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील संगीताचे कौतुक झाले. त्यानंतर त्यांची भेट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याशी झाली आणि त्यांनी अमित त्रिवेदी यांना देव डी मध्ये संधी दिली.

‘इमोशनल अत्याचार’ हे गाणे स्वतः अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायले होते, मात्र सुरुवातीला त्यांनी आपले नाव क्रेडिटमध्ये दिले नव्हते. गाणे फ्लॉप झाले तर करिअरवर परिणाम होईल, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले होते. पण गाणे सुपरहिट ठरले आणि जवळपास 9 वर्षांनी हा खुलासा करण्यात आला.

‘देव डी’नंतर अमित त्रिवेदी यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी उडान, क्वीन, लुटेरा, इश्कजादे आणि उड़ता पंजाब यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in