• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फॅटी लिव्हर ग्रेड-2 च्या निदानाचा अर्थ काय ? हा आजार किती धोकादायक ?

February 9, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण वाढल्याने त्यातच शरीराची हालचाल होत नसल्याने अनेक आजार होत आहेत. त्यात फॅटी लिव्हरच्या प्रकरणातही वाढ होत आहे. अल्ट्रा साऊंड रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर ग्रेड-२ चे निदान होणे सामान्य झाले आहे. ग्रेड-२ चे निदान झाल्यानंतर अनेक लोक घाबरतात. त्यांना वाटते हा गंभीर आजार आहे.ग्रेड-२ फॅटी लिव्हर म्हणजे नेमके काय असते ? हा का होतो ? आणि याचा कंट्रोल कसे केले जाऊ शकते. या संदर्भात जाणून घेऊयात…

दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागातील डॉ. अजित कुमार यांनी सांगितले की फॅटी लिव्हर हा कॉमन आजार झाला आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला ग्रेड-२ होत नाही. बहुतांश प्रकरणे ही ग्रेड-१ ची असतात. मात्र, ग्रेड-२ चा अर्थ आजार सुरु झाला आहे आणि याला वेळेवर कंट्रोल करणे गरजेचे आहे. डॉ. कुमार यांनी सांगितले की जेव्हा कोणा व्यक्तीच्या लिव्हरच्या पेशी जास्त फॅट होते, तेव्हा यास फॅटी लिव्हर म्हटले जाते. याच्या विविध ग्रेड असतात. ग्रेड-२ मध्ये जास्त फॅट जमा होते. आधी ही समस्या दारु पिणाऱ्यामध्ये पाहायला मिळाली होती. आता दारु न पिणाऱ्यांमध्येही हा आजार होत आहे.

फॅटी लिव्हर ग्रेड-२ चा अर्थ काय ?

डॉ. कुमार यांनी सांगितले की जेव्हा लिव्हरमध्ये फॅट जमते तेव्हा त्यास तातडीने कमी करण्याची गरज असते. या स्टेजमध्ये खान-पान आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करुनही समस्येवर नियंत्रण करता येते. काही प्रकरणात औषधाची देखील गरज असते. परंतू बहुतांशी लोकात ही स्टेथ सहज नियंत्रणात येते. परंतू तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस पासून ते लिव्हर फेल होईपर्यंत परिस्थिती उद्भवू शकते.

फॅटी लिव्हर ग्रेड-२ असा टप्पा आहे. ज्यात आजाराला नियंत्रित देखील करता येते. परंतू अनेक लोक याला हलक्यात घेतात आणि खाण्यापिण्याचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे पुढे जाऊन हा आजार गंभीर स्वरुप धारण घेऊ शकतो असे डॉ. कुमार यांनी म्हटले आहे.

फॅटी लिव्हर ग्रेड-2 कशामुळे होत असतो ?

जास्त तळलेले पदार्थ खाणे

जंक फूड खाणे

लठ्ठपणा आणि पोटाची अतिरिक्त चरबी

हाय कोलेस्ट्रॉल

एक्सरसाईज न करणे

फॅटी लिव्हर ग्रेड-२ चे लक्षण काय असतात?

कायम थकवा येणे

पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा आणि हलके दुखणे

भूक कमी लागणे

वजन वेगाने वाढणे

अपचनाची समस्या

फॅटी लिव्हर ग्रेड-2 काय केल्यास औषधांची गरज लागणार नाही

रोज किमान 30 मिनिटे एक्सरसाईज करा

वजन घटवा

फास्ट फूडपासून दूर रहा

हिरव्या भाज्या आणि मौसमानुसार फळांचा आहारात समावेश करावा



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून
  • Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?
  • T20 WC: सेमीफायनल शर्यतीतून ऑस्ट्रेलिया आऊट! मॅन ऑफ द टूर्नामेंटबाबत माजी क्रिकेटपटूचं भाकीत
  • शरद पवार यांच्यावर उपचार सुरू, हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे मोठे आवाहन; म्हणाले सर्वांना विनंती की…
  • 14 वर्षांपूर्वीचं 3 मिनिट 54 सेकंदाचं वादग्रस्त गाणं, ज्यामुळे झालेला प्रचंड वाद, लोक लपून लपून बघायचे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in