• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्या व्यवसायात ढकलते, अभिनेत्यांसोबत तर…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

March 14, 2026 by admin Leave a Comment


फिल्म इंडस्ट्रीची झगमती आणि ग्लॅमरस बाजू सर्वांना दिसते आणि चांगली देखील वाटते. पण पडद्यामागचं काळं सत्य फार कोणाला माहिती नसतं. पूर्वी अभिनेत्री याबद्दल अधिक बोलत नव्हत्या, पण आता अभिनेत्री त्यांना आलेला अनुभव आणि इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चालतं… याबद्दल सांगतात. आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडचं काळ सत्य समोर आणलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री तनुश्री दत्ता आहे. तिच्या MeToo मोहिमेमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा खरा चेहरा जगा समोर आला. आता इंडस्ट्रीबद्दल तनुश्री हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनुश्री दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

तनुश्री दत्ता म्हणाली, ‘हँडसम आहे.. सुंदर आहे… म्हणून अनेकांनी डोक्यावर घेतलं आहे. पण प्रतिभा आहे की नाही… याबद्दल काहीही माहिती नसतं… इंडस्ट्रीमध्ये सर्वांना कौतुक करणारं कोणी ना कोणी भेटूनच जातं… ‘तू तर हिरोईन बनशील…’, लहानपणीचं उदाहरण देत तनुश्री म्हणाली, ‘आई – वडील लहानपणी काय सांगायचे, अनोळखी लोकांसोबत बोलायचं नाही, कोणी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही. पण इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट वेगळ्या प्रकारचे असतात… लोक तुमच्या महत्त्वाकांक्षा, आशा आणि इच्छांचा वापर करतात. ते त्यांच्याशी खेळतात.’

वेश्या व्यवसायावर तनुश्री दत्ता हिचा मोठा खुलासा…

तनुश्री म्हणाली, ‘काही मुली वेश्या व्यवसाय करण्यास सुरुवात करतात, कारण त्यांच्यासोबत इतकं वाईट झालेलं असते… तर काही मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं… काही लोक इतके दुखावलेले असतात की ते त्यांच्या घरी परत जातात.” तनुश्रीने स्पष्ट केलं की, या कथा क्वचितच सार्वजनिक होतात कारण इंडस्ट्री फक्त यशोगाथाच उलगडते. ती म्हणाली, “हे रहस्य कधीच बाहेर येत नाहीत. कारण फक्त यशोगाथा बाहेर येतात..’ यामुळे अभिनेत्रीने नव्या कालाकारांना सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनुश्री दत्ता हिची चर्चा सुरु आहे.

तनुश्री दत्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला होता. पण त्यानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर झाली. 2018 मध्ये तनुश्री हिने MeToo मोहिमे दरम्यान दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले. पण नाना पाटेकर यांनी सर्व आरोप फेटाळले. आता तनुश्री इंडस्ट्रीपासून दूर एकांत आयुष्य जगत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री अध्यात्मिक वाट निवडली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in