• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा..; गौरव मोरेसाठी छाया कदम यांची खास पोस्ट

April 9, 2026 by admin Leave a Comment


'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे यानं नुकतंच मुंबईत हक्काचं घर घेत आपलं मोठं स्वप्न पूर्ण केलं. गौरवच्या या यशाचा आनंद त्याच्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनाही आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी गौरवसाठी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे.

'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे यानं नुकतंच मुंबईत हक्काचं घर घेत आपलं मोठं स्वप्न पूर्ण केलं. गौरवच्या या यशाचा आनंद त्याच्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनाही आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी गौरवसाठी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये छाया कदम यांनी लिहिलंय 'स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या प्रेमात लहानापासून वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो.'

या पोस्टमध्ये छाया कदम यांनी लिहिलंय, 'स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या प्रेमात लहानापासून वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो.'

'जिद्द चिकाटी आणि भारावलेपण घेऊन अमिताभजींच्या प्रेमात ‘भूतनाथ’ झालेला गौरव पुढे परिस्थितेच्या सगळ्या ‘दिवार’ तोडत  सोबत ‘शहेनशाह’चा आत्मविश्वास घेऊन आपल्या कामातून दरवेळी ‘शोले’ भडकवून एक दिवस स्वतःच्या पायावर ‘डॉन’सारखा उभा राहून असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना ‘वजीर’ होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो आणि हेच त्याचं आपलेपण गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ करतात' अशा शब्दांत छाया कदम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

'जिद्द, चिकाटी आणि भारावलेपण घेऊन, अमिताभजींच्या प्रेमात ‘भूतनाथ’ झालेला गौरव, पुढे परिस्थितेच्या सगळ्या ‘दिवार’ तोडत, सोबत ‘शहेनशाह’चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी ‘शोले’ भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर ‘डॉन’सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना ‘वजीर’ होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो आणि हेच त्याचं आपलेपण गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ करतात,' अशा शब्दांत छाया कदम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

गौरवचं कौतुक करत त्यांनी पुढे लिहिलं 'कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो. आणि काय कमाल आहे ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेलं त्याच झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला. गौरव.. तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा ‘जलसा’ करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे.'

गौरवचं कौतुक करत त्यांनी पुढे लिहिलं, 'कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो. आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेलं त्याच झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला. गौरव.. तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा ‘जलसा’ करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे.'

'तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका. बाकी तुझ्यातला ‘नटवरलाल’ असा अभिनय क्षेत्रातले तुझे ‘सरकार राज’ अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा आणि शेवटचं.. परंपरा - प्रतिष्ठा और अनुशासन.. मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन' असा गौरवचा गाजलेला डायलॉग त्यांनी पोस्टच्या अखेरीस लिहिला.

'तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका. बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’ असा अभिनय क्षेत्रातले तुझे ‘सरकार राज’ अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा आणि शेवटचं.. परंपरा – प्रतिष्ठा और अनुशासन.. मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन,' असा गौरवचा गाजलेला डायलॉग त्यांनी पोस्टच्या अखेरीस लिहिला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in