• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फळांपासून घरीच सोप्या पद्धतीने बनवा शुगर फ्री आईस्क्रीम, जाणून घ्या रेसिपी

April 1, 2026 by admin Leave a Comment


कडक उन्हाळ्यात आपल्याला थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. प्रखर ऊन, वाढते तापमान आणि घामाघूम करणाऱ्या दिवसांमध्ये थंडगार पदार्थ खाल्ल्याने दिलासा मिळतो. अशातच या रखरखत्या उन्हात फक्त आईस्क्रीमचे नाव काढले तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक आईस्क्रीममध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि आरोग्यासाठी हानिकारक फॅटचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

अशावेळेस तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ इच्छित असाल, तर शुगर फ्री आईस्क्रीम हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ते केवळ चविष्टच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शुगर फ्री आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार त्यातील घटक बदलू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण आरोग्यदायी आईस्क्रीम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

केळ्यापासून बनवा शुगर फ्री आईस्क्रीम

तुम्ही घरी केळीपासून अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकता. यासाठी तुम्हाला 2 पिकलेली केळी, 1/2 कप दूध आणि 1/2 चमचा व्हॅनिला इसेंस लागेल. प्रथम केळी कापून 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवा. आता या केळीमध्ये दूध आणि व्हॅनिला इसेंस टाकून सर्व मिश्रणांची पेस्ट बनवा. ही पेस्ट आणखी एक तास फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगार शुगर फ्री केळीपासून बनवलेले आईस्क्रीम सर्व्ह करा.

मँगो योगर्ट आईस्क्रीम

मँगो योगर्ट आईस्क्रीम बनवण्यासाठी, 1 कप आंब्याचा गर, 1/2 कप घट्ट दही आणि 1 ते 2 खजूर घ्या. हे सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये टाकून एकत्र वाटून घ्या. ही पेस्ट आईस्क्रीम ट्रे किंवा आईस्क्रीम मोल्डमध्ये टाका आणि 5 ते 6 तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर कडक उन्हातून घरी आल्यावर मँगो योगर्ट आईस्क्रीम चमच्याने काढून सर्व्ह करा.

चॉकलेट पीनट बटर आईस्क्रीम

ही आईस्क्रीम बनवण्यासाठी, 2 फ्रोजन केळी, 1 मोठा चमचा पीनट बटर आणि 1 छोटा चमचा कोको पावडर घ्या. मिश्रण क्रीमी होईपर्यंत सर्व साहित्य मिक्सच्या भांड्यात टाकून एकत्र वाटून घ्या. तुम्ही ते लगेच खाऊ शकता, किंवा आईस्क्रीम ट्रेमध्ये मिश्रण ओता आणि 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थंडगार तसेच चव आणि आरोग्याचा हा एक उत्तम मिलाफ असलेली आईस्क्रीम खाण्यास तयार आहे, जी तुम्हाला उन्हाळ्यात ताजेतवाने करेल.

स्ट्रॉबेरी कोकोनट आईस्क्रीम

स्ट्रॉबेरी कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी, 1 कप ताज्या स्ट्रॉबेरी, 1/2 कप नारळाचे दूध आणि 2 ते 3 खजूर गोडव्यासाठी घ्या. प्रथम स्ट्रॉबेरी कापून 2 ते 3 तास ​​फ्रीजमध्ये ठेवा. आता ब्लेंडरमध्ये स्ट्रॉबेरी, नारळाचे दूध आणि खजूर टाका आणि मिश्रण क्रीमी होईपर्यंत ब्लेंड करा. हे मिश्रण एका भांड्यात ओतून 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवा. आईस्क्रीम स्कूपच्या साहाय्याने काढून थंडगार सर्व्ह करा.

हे आईस्क्रीम स्वादिष्ट आणि शूगर फ्री आहेत, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात कोणत्याही काळजीशिवाय थंडगार आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..
  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in