
इराण युद्धामुळे संपूर्ण जगापुढे उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतातही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई पाहायला मिळत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरची किंमतही वाढली असून सिलिंडर वेळेवर मिळत नाहीये. दरम्यान, या जगात सर्वात महाग आणि स्वस्त पेट्रोल कुठे मिळते, ते जाणून घेऊ या…
पाकिस्तानात पेट्रोल खूपच महाग आहे. सध्याच्या स्थितीत पाकिस्तानात डिझेलचा भाव 54.9 टक्क्यांनी वाढून थेट 520.35 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. पेट्रेलची किंमत 42.7 टक्क्यांनी वाढून 458.40 रुपये प्रति लिटर झाली आहे.
युरोपातही पेट्रोलचा भाव अनेक देशांत वेगवेगळा आहे. डेन्मार्कमध्ये पेट्रोल 2.66 डॉलर (247.25 रुपये) आहे. सिंगापूरमध्ये पेट्रोलचा भाव 2.54 डॉलर (236.1 रुपये) आहे. जर्मनीत पेट्रोलचा भाव 2.42 डॉलर (224.95 रुपये) प्रति लिटर आहे.
या जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे आहे, याचे उत्तर म्हणजे इराण. इराणमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते. इराणध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 0.029 डॉलर म्हणजेच साधारण 2.69 रुपये आहे. इराणमध्ये पेट्रोलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
इराणच्या युद्धामुळे जगात अनिश्चितता आहे. तरीदेखील व्हेनेझुएला देशातही पेट्रोल खूपच स्वस्त मिळते. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 0.035 डॉलर म्हणजेच 2.70 रुपये आहे.




Leave a Reply