• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट, प्रदर्शित होताच झाला ब्लॉकबस्टर

February 5, 2026 by admin Leave a Comment


Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये जितका स्टारडम आणि स्वॅग चर्चेत असतो तितकीच चर्चा कलाकारांमधील इगोची देखील असते. ज्येष्ठ कलाकार आणि नव्याने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले स्टार्स यांच्यातील हा अहंकाराचा खेळ दशकानुदशके बॉलिवूडमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे या इगोपासून सदीचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा कधीच सुटले नाहीत.

अमिताभ बच्चन जेव्हा बॉलिवूडमध्ये मोठे सुपरस्टार बनले होते त्यावेळीही एका ज्येष्ठ अभिनेत्याने इगोच्या कारणामुळे त्यांच्या सोबत काम करण्यास नकार दिला होता. हा किस्सा आजही बॉलिवूडमधील चर्चित घटनांपैकी एक मानला जातो. ज्या अभिनेत्याबद्दल हा किस्सा सांगितला जातो, ते म्हणजे दिग्गज अभिनेते राजकुमार. राजकुमार आपल्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी, ठसकेबाज डायलॉग डिलिव्हरीसाठी आणि खास अकडीतल्या वावरासाठी ओळखले जात होते. त्यांच्या अभिनयातील रॉयल अंदाज त्या काळात प्रेक्षकांच्या डोक्यावर बसलेला होता.

प्रसिद्ध दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी राजकुमार यांना ‘देश प्रेमी’ या चित्रपटासाठी भूमिका ऑफर केली होती. मात्र, ही ऑफर स्वीकारण्याआधीच राजकुमार यांनी एक अट घातली. त्यांची फी अमिताभ बच्चनपेक्षा जास्त असावी. अनुभवी दिग्दर्शक मनमोहन देसाई लगेचच ओळखून होते की, हा विषय पैशाचा नसून इगोचा आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी राजकुमार यांना अमिताभ बच्चनपेक्षा फक्त एक रुपया जास्त फी देण्याची ऑफर दिली. मात्र, तरीही राजकुमार या चित्रपटासाठी तयार झाले नाहीत.

अखेर भूमिका परीक्षित साहनींकडे

राजकुमार यांना पुन्हा पुन्हा मनवण्याऐवजी मनमोहन देसाई यांनी तोच रोल परीक्षित साहनी यांना ऑफर केला. दिग्दर्शकांनी पात्रात थोडेफार बदल करत रोल रीराइट केला आणि परीक्षित साहनी यांनी ही भूमिका आनंदाने स्वीकारली.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र ‘देश प्रेमी’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवलं. अमिताभ बच्चन आणि मनमोहन देसाई यांचा हा पाचवा एकत्रित चित्रपट होता आणि याआधीप्रमाणेच ही जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरली. चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

‘देश प्रेमी’मध्ये अमिताभ बच्चन यांनी डबल रोल साकारला होता, जो त्यांच्या चाहत्यांसाठी अक्षरशः डबल ट्रीट ठरला. त्यांच्यासोबत चित्रपटात हेमा मालिनी, शर्मिला टागोर, नवीन निश्चल, परवीन बाबी, उत्तम कुमार, शम्मी कपूर, प्रेमनाथ, परीक्षित साहनी, अमजद खान आणि गीता सिद्धार्थ यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in