• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त डाळिंब नाही तर, सालीचे देखील आहेत अनेक महत्त्वाचे फायदे, घ्या जाणून

April 8, 2026 by admin Leave a Comment


डाळिंब दिसायला देखील प्रंचड सुंदर आणि चवीला देखील उत्तम असतं… डॉक्टर कायम डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. कारण छोट्या दिसणाऱ्या या फळाचे अनेक फायदे आहेत… लहान मुलांपासून, मोठ्यापर्यंत प्रत्येकाला डाळिंब आवडतात. म्हणूनच डाळिंबाला खूप मागणी आहे. पण डाळिंब खाल्ल्यानंतर आपण सर्वजण त्याची साल कचऱ्यात फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का की डाळिंबाप्रमाणेच त्याची सालसुद्धा खूप फायदेशीर आहे आणि तिच्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात.

डाळिंबाच्या सालीमध्ये फिनोलिक ॲसिड, फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन, पोटॅशियम, कॅल्शियम, प्रथिने, फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. म्हणून जाणून घ्या डाळिंबाची साल खाण्याचे काय फायदे आहेत.

डाळिंबाच्या सालीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?

डाळिंबाची साल त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे, डाग असतील, तर तुम्ही वाळलेल्या डाळिंबाच्या सालीच्या पावडरची पेस्ट बनवून ती गुलाब पाण्यात मिसळू शकता. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील जीवाणू कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व चमकदार बनते. हे एका नैसर्गिक फेस पॅकप्रमाणे काम करते, जे कोणत्याही रसायनांशिवाय त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

उन्हाळ्यात अतिसार किंवा पचनाच्या समस्या सामान्यपणे उद्भवतात. अशा परिस्थितीत, डाळिंबाच्या सालीची पूड ताकात मिसळून त्यात थोडे भाजलेले जिरे घाला आणि ते प्या. यामुळे पोटातील हानिकारक जीवाणू नष्ट होण्यास आणि आतड्यांची सूज कमी होण्यास मदत होते. तसेच, हा घरगुती उपाय पचनक्रिया संतुलित ठेवण्यासाठी आणि पोटाला आराम देण्यासाठी उपयुक्त आहे.

डाळिंबाची साल केसांसाठी खूप फायदेशीर असते. ती केसांना मजबूत करते आणि केस गळणे थांबवते. केसांना डाळिंबाच्या सालीची पावडर लावल्याने कोंडा घालवण्यासाठीही मदत होते. डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि शरीराला संसर्गापासून वाचवतात.

याव्यतिरिक्त, डाळिंबाच्या सालीचा वापर मूळव्याधीसारख्या समस्यांमध्येही फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार, ताकासोबत डाळिंबाची पावडर सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, जी मूळव्याधीचे मुख्य कारण आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमच्या आवडीचे आईस्क्रीम सांगेल तुमचा स्वभाव, चॉकलेट फ्लेवर आवडणारे लोक तर…
  • उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
  • धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in