• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त एक-दोन की, भारताच्या सगळ्याच जहाजांना हॉर्मुझ पार करण्याची परवानगी? इराणच्या राजदूतांनी खरं काय ते सांगितलं

March 15, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षा दरम्यान काही भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे, असं इराणचे भारतातील राजदूत Mohammad Fathali यांनी शनिवारी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून असलेले मैत्रीसंबंध आणि संयुक्त हित डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. इंडिया टुडे कॉन्क्लेव 2026 मध्ये Mohammad Fathali बोलत होते. सुरुवातीला भारतासोबत संवाद स्थापन करताना काही अडचणी आलेल्या. पण आता दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतायत असं ते म्हणाले.

“आम्ही काही जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे. पण किती जहाजांना परवानगी दिलीय ते आता सांगू शकत नाही. या मुद्यावर पुढे माहिती दिली जाईल. इराण आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि संयुक्त हित आहे” असं Mohammad Fathali यांनी सांगितलं. शुक्रवारी इराणने भारतीय झेंडा असलेल्या दोन LPG जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिलेली. अमेरिका आणि इस्रायलने मिळून 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केला. त्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील जल वाहतूक बाधित झाली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.

या जलमार्गावर इराणचं नियंत्रण

स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील एका महत्वाच्या समुद्री मार्गापैकी एक आहे. या जलमार्गावर इराणचं नियंत्रण आहे. जागतिक तेल पुरवठ्याची जवळपास 20 टक्के तेल वाहतूक या मार्गावरुन होते. हा मार्ग बंद झाल्यामुळे भारताची समस्या वाढली आहे. भारताच्या एकूण कच्चा तेलाच्या जवळपास 40 टक्के आणि LNG चा 50 टक्केपेक्षा अधिक आणि जवळपास 90 टक्के एलपीजी याच मार्गावरुन येतो. सध्या भारतात तेलापेक्षा एलएनजीचं संकट अधिक गंभीर बनलं आहे. कारण भारताकडे जवळपास दोन महिने पुरेल इतका तेल साठा आहे.

“भारत-इराण संबंध भक्कम करण्यावर त्यांनी भर दिला. दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर शत्रू त्याचा फायदा उचलेलं. दोन्ही देश इतके परिपक्व आहेत की, ते राजकीय आणि सामाजिक मुद्दे संभाळू शकतात” असं कॉन्क्लेव मध्ये Mohammad Fathali म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in