• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात अंदाधुंदं गोळीबार, क्षणार्धात सगळं सपलं, नुसता रक्ताचा सडा

January 27, 2026 by admin Leave a Comment


मॅक्सिकोतून मोठी बातमी समोर येत आहे, मॅक्सिकोच्या गुआनाजुआतोमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, फूटबॉलचा सामना पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलं होतं, त्याचवेळी काही शस्त्रधारी हल्लेखोरांकडून प्रेक्षकांवर अंदाधुंद फायरिंग करण्यात आली, या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सेंट्रल मॅक्सिकोमधील सलामंकामध्ये एका फूटबॉल मैदानात सामना पहाण्यासाठी आलेल्या लोकांवर बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये काही महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.

या घटनेवर सलामंकाचे महापौर प्रीटो यांनी दु:ख व्यक्त केलं आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जेव्हा फूटबॉलचा सामना संपला तेव्हा हे बंदूकधारी व्यक्ती मैदानात घुसले, नुकतीच मॅच संपल्यामुळे मैदानात मोठी गर्दी होती. याचवेळी त्यांनी तेथील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जणाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तर या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुढे बोलताना प्रीटो यांनी असं देखील म्हटलं की दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत, अशा घटना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना लगाम लावण्यासाठी आम्ही राष्ट्रपती क्लाउडिया शिनबाम यांच्याकडे मदत मागितली आहे. स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारांच्या टोळ्या पकडण्याचं काम सुरू आहे, मात्र दुर्दैवाने त्यात अजून तरी म्हणावं असं यश आलेलं नाहीये. दरम्यान ही घटना कशामुळे घडली? फायरिंगचं नेमकं कारण काय होतं? या हल्ल्यामागे कोणाचा हात होता? याचा तपास आता पोलिस करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Russia-India: खरंच भारत, रशियाकडून इंधन खरेदी करणार बंद? ट्रम्प यांनी तर केलं जगजाहीर, सत्य काय?
  • Tuesday Rules : मंगळवारी चुकूनही विकत घेऊ नका या गोष्टी, आयुष्य होईल बरबाद..
  • Share Market: भारत-अमेरिका व्यापार कराराने बाजाराला आनंदाचे भरते; Sensex आणि Nifty ची रॉकेट भरारी
  • अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं
  • US-India Trade Deal: एक फोन आणि सूत्रं फिरली, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चेनंतर घटले टॅरिफ, रात्रीतूनच बदलल्या या 5 गोष्टी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in