• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’च्या टीममधल्या महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन; अवघ्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

March 11, 2026 by admin Leave a Comment


‘फुलवंती’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेल्या तन्मय वनमाळीचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तन्मयने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांसाठीही सिनेमॅटोग्राफ म्हणून काम केलंय. त्यामुळे त्याच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. तन्मय हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत होता. त्याच्या कामाचं अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून कौतुक केलं जात होतं.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी त्याने महेश लिमये यांच्यासोबत काम केलं होतं. याशिवाय प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. हिंदीत ‘दबंग 2’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘हिरामंडी’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या गाजलेल्या प्रोजेक्ट्समध्ये त्याने काम केलं आहे. कमी वयात त्याची कामावर चांगली पकड होती. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याने चित्रपटांमधील अनेक दृश्ये अत्यंत सुंदररित्या टिपली आहेत. नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटासाठीही तन्मयनं काम केलं होतं.

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विविध प्रोजेक्ट्ससाठी तन्मयने काम केलं आहे. छोट्यातलं छोटं दृश्य कॅमेरात अत्यंत सर्जनशीलतेनं कसं टिपायचं, ही कला त्याला आत्मसात होती. यात कलेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर तो मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत होता. त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तन्मयच्या निधनावर वसईचे नेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. तर सिनेक्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना महेश लिमये यांनी व्यक्त केली. ‘खूप वाईट.. तन्मय खूप आठवण येत राहील बाळा’, अशा शब्दांत अभिनेते जयवंत वाडकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित तन्मयला श्रद्धांजली वाहिली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
  • एकही रुपया खर्च नाही, झटक्यात नाहीसे होईल कोळ्याचे जाळे, फक्त वापरा किचनमधील ही एक…
  • IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in