• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

April 7, 2026 by admin Leave a Comment


‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘विठू माऊली’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता शेखर फडकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखरचे वडील विजयकुमार फडके यांचं सोमवारी (6 एप्रिल 2026) रोजी निधन झालं. शेखरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. वयाच्या 76 व्या वर्षी आपल्या वाढदिवशीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयकुमार यांचा जन्म 6 एप्रिल 1949 रोजी झाला होता. तर 6 एप्रिललाच त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शेखरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर इंडस्ट्रीतील इतर कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

शेखरची पोस्ट-

‘दु:खद बातमी. आज दिनांक 6 एप्रिल रोजी माझ्या बाबांना, विजयकुमार फडके यांना पहाटे 2 वाजता देवाज्ञा झाली. बाबा 76 वर्षांचे होते आणि आजच त्यांचा वाढदिवस होता. (6 एप्रिल 1949 ते 6 एप्रिल 2026) त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, तुमची प्रार्थना उपयोगाची पडणार, यासाठी तुम्हाला कळवत आहे. (मी शेखर फडके आणि माझा भाऊ शिरीष फडके आणि परिवार)’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘या कठीण काळात धैर्याने राहण्याची ताकद आणि संयम तुला मिळो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. ‘अत्यंत दु:खद बातमी, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shekhar Phadake (@shekharphadakeofficial)

शेखर फडकेनं मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘आटली बाटली फुटली’, ‘गडबड गोंधळ’, ‘थैमान’, ‘निवडुंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. तर ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘आपला बुआ असा आहे’, ‘विठू माऊली’, ‘405 आनंदवन’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘साहेब बीवी आणि मी’ आणि ‘सरस्वती’ यांसारख्या मालिकांमध्येही तो झळकला आहे. शेखर त्याच्या नकारात्मक भूमिकांसाठी विशेष ओळखला जातो. ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतही त्याने उल्लेखनीय भूमिका साकारली होती. सध्या तो ‘तू ही रे माझा मितवा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरातील या 5 वस्तू क्षणात चमकतील, ॲपल सायडर व्हिनेगरचा असा करा वापर
  • GK : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? 99 टक्के लोकांना नावही माहिती नाही!
  • RR vs MI : बुमराहच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स, 6 चेंडूत 34 धावा, वैभव सूर्यवंशीचा तडाखा, पाहा व्हीडिओ
  • Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्याचा प्लॅन? ही 7 ठिकाणे आहेत बेस्ट
  • प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in