• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड लोकप्रिय सीरिज, 3 भागांनी चाहत्यांना लावलं प्रचंड वेड, 1-2 नाही तर 11 कलाकारांचे बदलले नशीब, चौथा भाग लवकरच…

March 22, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या विविध प्रकारच्या वेब सीरिज आणि चित्रपटांचा अक्षरशः पूर आला आहे. Netflix आणि Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी अलीकडे अनेक नव्या सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. तसेच काही लोकप्रिय सीरिजच्या सिक्वेल्सचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या सर्वांमध्ये एक अशी सीरिज आहे, जिने ओटीटीवर एक वेगळाच ट्रेंड निर्माण केला आणि प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली.

ही क्राइम थ्रिलर सीरिज म्हणजे ‘मिर्जापुर’. दमदार कथा, वास्तववादी पात्रं आणि टोकदार संवाद यांच्या जोरावर या सीरिजने प्रचंड लोकप्रियता मिळवली. सेक्रेड गेम्स नंतर सर्वाधिक चर्चेत आलेल्या सीरिजमध्ये ‘मिर्जापुर’चा समावेश होतो. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले असून चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सर्वात लोकप्रिय क्राईम थ्रिलर सीरिज

‘मिर्जापुर’चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रदर्शित झाला. गेल्या काही वर्षांत या सिरीजने 8.4 अशी IMDb रेटिंग मिळवत आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, स्थानिक बोलीभाषा आणि वास्तववादी गुन्हेगारी विश्व यांचा संगम या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. या सीरिजने सिद्ध करून दाखवले की, ग्रामीण आणि प्रादेशिक विषयांवर आधारित कंटेंटही मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो.

या सीरिजनंतर ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित पंचायत, रक्तांचल, दुपहिया आणि मिट्टी यांसारख्या अनेक सीरिज प्रेक्षकांसमोर आल्या. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित खाकी आणि जामताड़ा यांसारख्या सीरिजही लोकप्रिय ठरल्या.

मिर्जापुरमधील कलाकार

‘मिर्जापुर’ने अनेक कलाकारांचे करिअर बदलून टाकले. पंकज त्रिपाठी यांनी साकारलेला ‘कालीन भैया’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आयकॉनिक भूमिका आहे. त्याचप्रमाणे दिव्येंदु शर्माला ‘मुन्ना भैया’ या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली.

विक्रांत मैसीला ‘बबलू पंडित’च्या भूमिकेतून आपली वेगळी छाप पाडली तर अली फजल ‘गुड्डू पंडित’ म्हणून घराघरात पोहोचला. श्रेया पिलगांवकर (स्वीटी गुप्ता) आणि श्वेता त्रिपाठी (गोलू गुप्ता) यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली.

याशिवाय अभिषेक बनर्जी यांनी ‘कंपाउंडर’च्या भूमिकेतून वेगळी ओळख निर्माण केली. पुढे त्यांनी पाताल लोक मधील ‘हथौडा त्यागी’ या भूमिकेमुळे अधिक प्रसिद्धी मिळवली. रसिका दुग्गलने ‘बीना त्रिपाठी’ची भूमिका साकारत प्रभाव टाकला. दुसऱ्या सीझनमध्ये अंजुम शर्मा (शरद शुक्ला) ची एंट्री झाली, ज्यामुळे कथेला नवे वळण मिळाले. तसेच इशा तलवार यांनी ‘माधुरी यादव’च्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in