• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड लोकप्रिय सीरिज, पाहण्यास सुरुवात केली तर दिवस-रात्र कळत नाही, OTT नंतर आता बॉक्स ऑफिसवर गाजवणार, IMDb रेटिंग 9

February 2, 2026 by admin Leave a Comment


भारताच्या सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ आता मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अ‍ॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त प्रस्तुतीतून साकारली जाणारी ‘मिर्झापूर: द फिल्म’ ही भारतातील सर्वात यशस्वी क्राईम-थ्रिलर ओटीटी फ्रँचायझीचे चित्रपट रूपांतर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे.

‘मिर्झापूर: द फिल्म’चे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपटाचा अंतिम शेड्यूल अधिकृतरित्या रॅप झाला आहे. ही घोषणा निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. दमदार आणि थरारक थीम म्युझिकसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी ‘It’s a wrap! #MirzapurTheFilm’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘मिर्झापूर: द फिल्म’ने ऑरमॅक्स सिनेमॅटिक्सच्या ‘मोस्ट अवेटेड हिंदी फिल्म्स’ यादीतही आपले स्थान पटकावले आहे. हा चित्रपट सध्या देशातील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. विशेषतः चाहत्यांना पुन्हा एकदा मुन्ना भैया या आयकॉनिक भूमिकेला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

पुनीत कृष्णा यांच्या निर्मितीत आणि गुरमीत सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘मिर्झापूर: द फिल्म’ 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वेब सिरीजमधील सर्व लोकप्रिय आणि लक्षवेधी पात्रे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये कालीन भैया (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदु), आणि अभिषेक बनर्जी यांचा समावेश आहे.

वेब सिरीजमधील सत्ता संघर्ष, रक्तरंजित राजकारण, सूड आणि थरार याच सगळ्या घटकांचा भव्य अनुभव प्रेक्षकांना आता सिनेमागृहात मिळणार आहे. थिएटरमध्ये देशभर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट थिएट्रिकल रिलीजच्या आठ आठवड्यांनंतर भारतासह 240 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये प्राइम मेंबर्ससाठी स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

एकूणच, ‘मिर्झापूर: द फिल्म’ हा केवळ एक चित्रपट नसून चाहत्यांसाठी एक मोठा सिनेमॅटिक इव्हेंट ठरणार आहे. वेब सिरीजने निर्माण केलेली क्रेझ आता मोठ्या पडद्यावर किती मोठा धमाका करते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in