• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पोलीस चौकशीत काय काय घडलं? प्रतिभा चाकणकर आणि वकिलाने काय दिली माहिती? पहिली प्रतिक्रिया काय?

April 13, 2026 by admin Leave a Comment


भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत आहेत. राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांतून तब्बल 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता. या प्रकरणी आज प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

बनावट खाते उघडण्यात आले – प्रतिभा चाकणकर

शिर्डी पोलिसांनी आज प्रतिभा चाकणकर यांची कसून चौकशी केली. यानंतर बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी म्हटले की, हे खाते मी उघडले नाही, यातील सही माझी नाही, हे खाते बनावट आहे. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. देवदर्शनाच्या नावाखाली खरातने कागदपत्र घेतली होती. व्हाट्सपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा खाते उघडण्यासाठी वापर करण्यात आला असं प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलं आहे.

वकिलांनी काय म्हटले?

प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी म्हटले की, प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची बनावट खाती उघडली आहेत. त्या समता पतसंस्थेत कधीही गेल्या नाहीत. खाते उघडताना पत्ता देखील चुकीचा वापरण्यात आला. प्रतिभा आणि तन्मय याच्या सह्यांचे नमुने पोलिसांना दिले. सर्व खातरजमा झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. चाकणकर पोलिसांना वेळोवेळी सहकार्य आणि तपासात मदत करतील. पोलिसांची चौकशी सुरू आहे, कायदेशीर कारवाई बाबत चर्चा करूनच निर्णय घेऊ. मात्र पतसंस्थेत खाते आहे यासंदर्भात कोणतेही तथ्य नाही.

100 खात्यांना भोंदू खरात नॉमिनी

दरम्यान, अशोक खरातने महिलांचे शोषण करण्यासह भोंदू गिरी आणि आर्थिक गैर व्यवहार केल्याचे समोर आले आहे. राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये तब्बल 57 खातेदारांच्या नावावर 100 खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांना अशोक खरात हे नॉमिनी आहे, मात्र यातील अनेक खातेदारांनी पतसंस्थेत खाते आहे, याची माहिती नाही आणि आम्ही खाते उघडले नाही अशी माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे आता खरातने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…
  • 0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं
  • SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
  • Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…
  • ‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in