• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुढच्या 48 तासांत राज्यावर नवं संकट; हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्याने चिंता वाढली; नेमका इशारा काय?

April 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली.

दरम्यान, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत तापमानात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच पुणे, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात हवामान 32 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पावसानंतर आता विदर्भातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान 41 ते 42 अंश सेल्सियस पर्यंत वाढू शकते, असा अंदाज आहे.

दुसरीकडे मराठवाडा, विदर्भातही अशीच स्थिती राहू शकते. परंतु मराठवाड्यातील लातूरसारख्या काही भागात 9 एप्रिल रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा वाढू शकतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमच्या आवडीचे आईस्क्रीम सांगेल तुमचा स्वभाव, चॉकलेट फ्लेवर आवडणारे लोक तर…
  • उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
  • धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in