
महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीमधील अंतर्गत वादावर आणि आगामी राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर विधान केले आहे. भाजप सत्तेतले आपलेच मित्रपक्ष फोडणार आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार काय म्हणाले ?
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सत्तेतल्या मित्रपक्षांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह सत्तेत असलेल्या मित्रपक्षांना एक सूचना दिली आहे. भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील, असाही सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.
महाराष्ट्राला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2026
या विधानामुळे आगामी काळात महायुतीत मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आले असून, महायुतीमधील घटक पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply