• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पितृत्वाचा पहिला अनुभव; वडिलांच्या भावना पाहून नेटकरी देखील भावूक, Video व्हायरल

March 22, 2026 by admin Leave a Comment


Viral Video : एका बाळाचा जन्म हा केवळ एका कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनाचा क्षण नसतो तर तो अनेक भावनांचा संगम असतो. आईसाठी हा नऊ महिन्यांच्या प्रवासानंतरचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो तर वडिलांसाठीही तो तितकाच खास असतो. जेव्हा ते पहिल्यांदा आपल्या बाळाला कुशीत घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका भावनिक क्षणाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यातील एका वडिलांची पहिली प्रतिक्रिया लाखो लोकांच्या मनाला भिडत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका रुग्णालयातील दृश्य दिसत आहेत. ज्यामध्ये नर्स नवजात बाळाला वडिलांच्या हातात देताना दिसत आहे. बाळाला हातात घेताना वडील अतिशय काळजीपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्या क्षणी त्यांच्या भावना इतक्या तीव्र होतात की आनंद आणि जबाबदारीच्या मिश्र भावनेमुळे त्यांचे हात थरथर कापू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य आणि थोडीशी भीती अशा सर्व भावना एकत्र दिसतात.

हा क्षण इतका भावनिक असतो की बाळाला हातात घेतल्यानंतर ते वारंवार त्याला नीट पकडण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा हात थरथर कापायचा थांबत नाही. या व्हिडीओमधून वडील होण्याचा अनुभव किती गहिरा आणि मनाला स्पर्श करणारा असतो हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

नर्सने दिला आधार

या सगळ्या प्रसंगात नर्सची भूमिका देखील खूप महत्त्वाची ठरते. वडिलांना थोडी घाबरट वाटू लागल्यावर नर्स प्रेमाने त्यांच्या हातांना आधार देते. ती हसत-हसत त्यांना इशाऱ्यांनी सांगते की सगळं ठीक आहे आणि आता ते खऱ्या अर्थाने वडील झाले आहेत. नर्सचा हा छोटासा आधार त्या क्षणाला आणखी सुंदर आणि संस्मरणीय बनवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sugan Multispecialty Hospital (@drsuganyad3vi)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी म्हटलं आहे. एका यूजरने लिहिलं की, वडील होण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. तर दुसऱ्याने म्हटलं, हा क्षण आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. काहींनी या व्हिडिओमुळे त्यांना स्वतःच्या मुलांच्या जन्माचा क्षण पुन्हा आठवला असल्याचंही सांगितलं.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले
  • ‘धुरंधर’संदर्भातील त्या रीलवर एका ‘लाईक’मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in