• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पापमोचनी एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा जीवनात वाढू शकतात अडचणी

March 12, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मात एकादशीचे उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणारी पापमोचनी एकादशी ही अत्यंत फलदायी मानली जाते, ही एकादशी तीच्या नावाप्रमाणेच फळ देत असते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची योग्य विधींनी पूजा केल्याने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते. 2026 मध्ये या तिथीला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी काही निषिद्ध गोष्टी केल्याने उपवासाचे फायदे कमी होऊ शकतात आणि जीवनातील अडचणी वाढू शकतात. चला तर मग या एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

कधी आहे पापमोचनी एकादशी 2026

पंचांगानुसार एकादशी तिथी 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. ते 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी संपेल.

उदयतिथीच्या आधारावर पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार 15 मार्च 2026 रोजी पाळले जाईल.

पापमोचनी एकादशीच्या दिवशी कोणते कामं टाळावीत?

तामसिक अन्नाचे सेवन करू नका.

जे एकादशीचे उपवास करत नाहीत त्यांनी मांस, मासे, अंडी, मद्य आणि लसूण-कांदा यासारख्या तामसिक अन्नापासून दूर राहावे.

भात खाणे टाळा

धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीला भात खाऊ नये. ते एकादशी उपवासाच्या नियमांविरुद्ध मानले जाते.

राग आणि वादांपासून दूर राहा

एकादशीला मन शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे. या दिवशी भांडू नये तसेच वाद घालणे किंवा अपशब्द बोलणे टाळावे.

खोटेपणा आणि वाईट विचारांपासून दूर राहा

या पवित्र दिवशी खोटे बोलणे, एखाद्याबद्दल वाईट विचार करणे किंवा चुकीचे काम करणे अशुभ मानले जाते.

उशिरा झोपणे टाळा

एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान विष्णूचे स्मरण करावे. उशिरा झोपणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते.

पापमोचनी एकादशीच्या दिवशी काय करावे?

सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करा.

उपवासाचे व्रत केल्यानंतर दिवसभर भक्ती आणि उपासनेवर लक्ष केंद्रित करा.

विष्णु सहस्रनाम किंवा भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा.

गरजू लोकांसाठी दान करा आणि त्यांची सेवा करा.

पापमोचनी एकादशीचे धार्मिक महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला त्याच्या भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा विधीपूर्वक केली जाते. असे मानले जाते की जे लोकं हे व्रत खऱ्या मनाने करतात त्यांना मोक्ष मिळतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in