
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा टी20 मधील दबदबा कमी झाला आहे. असं असताना बिग बॅश लीग स्पर्धेत 299 धावांची खेळी केली होती. पण स्टीव्ह स्मिथ खेळत असलेला सिडनी सिक्सर्स संघ काही जेतेपद मिळवू शकला नाही. तसेच ऑस्ट्रेलियन संघातही स्थान मिळालं नाही. आता स्टीव्ह स्मिथने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Sydney Sixers Twitter)
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. पण स्टीव्ह स्मिथला या स्पर्धेत डायरेक्ट एन्ट्री मिळाली आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत नवा संघ उतरणार आहे. या सियालकोट स्टॅलियन्स संघासोबत स्मिथने करार केला आहे. संघाचा पाया रचण्यासाठी काही खेळाडूंना थेट घेण्याची परवानगी आहे. (Photo- Sydney Sixers Twitter)
स्टीव्ह स्मिथने वनडे संघातून निवृत्ती घेतली आहे. त्यात आयपीएल स्पर्धेच्या लिलावात स्टीव्ह स्मिथला कोणी भाव दिला नाही. त्यामुळे स्मिथला सिद्ध करण्यासाठी बिग बॅश लीग स्पर्धा हा एकमेव पर्याय उरला आहे. त्याने या स्पर्धेचा पुरेपूर फायदा घेतला आणि बिग बॅश लीग स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आता पीएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Sydney Sixers Twitter)
स्टीव्ह स्मिथ जगभरातील सर्व प्रमुख लीगमध्ये खेळला आहे. आता पहिल्यांदाच पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे. बिग बॅश लीग व्यतिरिक्त हंड्रेड, मेजर लीग क्रिकेट, आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि टी20 ब्लास्टमध्येही भाग घेतला आहे. (Photo- Sydney Sixers Twitter)
स्टीव्ह स्मिथला टी20 क्रिकेटमध्ये बराच अनुभव आहे. त्याने 272 टी20 सामन्यांमध्ये 32 पेक्षा जास्त सरासरीने 6242 धावा केल्या आहेत. यात पाच शतके आहेत. आता पीएसएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo- Sydney Sixers Twitter)




Leave a Reply