• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तान मोठ्या संकटात, आणीबाणी लागू, सरकारची मोठी घोषणा

February 6, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून, 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्लामाबादच्या तरलाई परिसरात असलेल्या इमाम बारगाह खदीजत-उल- कुबरामध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बाचाव पथक तातडीनं घटनास्थळी हजर झालं. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट नमाज सुरू असतानाच झाला आहे. या स्फोटामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मात्र हा स्फोट कोणी घडवून आणला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्यापपर्यंत या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.

दरम्यान या स्फोटनानंतर आता इस्लामाबादच्या सुरक्षा व्यव्यस्थेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं ज्या परिसरात ही घटना घडली आहे, तो संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुन्हा एखादी अशी घटना घडू नये, यासाठी आता पाकिस्तानमधील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं पहायला मिळत आहे. मशिदीमध्ये नमाज सुरू असतानाच हा स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

पाकिस्तानी मिडिया डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार नमाज सुरू असातना हा स्फोट झाला आहे, या स्फोटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. जखमी लोकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटानंतर संपूर्ण शहरात आणीबाणीची घोषणा करण्यात आली असून, हा स्फोट नेमका कोणी घडवून आणला? त्या मागचा उद्देश काय होता, याचा शोध आता सुरू झाला आहे. या स्फोटानंतर देशभरता भीतीचं वातावरण पसरलं असून, मोठा तणाव पहायला मिळत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?
  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in