• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तान का बनला धोकादायक ? अमेरिकेच्या तुलसी गबॉर्ड यांनी काय दिला इशारा ?

March 19, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेने इस्राईल सोबत इराणवर आक्रमण केले आहे. गेले २० दिवस हे युद्ध सुरु आहे. इराणकडे अण्वस्र तंत्रज्ञान आहे त्यामुळे इराणला टार्गेट करण्यात आले असताना आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबॉर्ड यांनी पाकिस्तानवर आण्विक मिसाईल तयार करत असल्याचा आरोप केला आहे. सीनेट इंटेलिजन्स कमिटीच्या समोर बोलताना तुलसी गबॉर्ड यांनी हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या समोर आता चीन, रशिया, उत्तर कोरिया आणि इराणनंतर आता पाकिस्तान देखील जगासाठी धोका म्हणून समोर आला आहे. त्यामुळे आता भारताला देखील पाकिस्तानपासून धोका निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिका आणि पाकिस्तानचे नाते परस्पर चांगले असल्याचे म्हटले जात आहे. परंतू आता पाकिस्तानच आण्विक शस्रास्रे तयार करण्याच्या मागे लागल्याचे खुद्ध अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबॉर्ड यांनी म्हटल्याने भारतासाठी ही स्थिती आणखीन धोकादायक म्हटली जात आहे. इराण हा साल २०३५ पर्यंत आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल विकसित करण्याच्या तयारीत आहे असे तुलसी गबॉर्ड यांनी म्हटले आहे. त्याच वेळी त्यांनी पाकिस्तानही लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाईलचा विकास करत असून त्यावर जर अण्वस्र लादले तर अमेरिकेला देखील धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती तुलसी गबॉर्ड यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेला काय भीती ?

पाकिस्तान सौदी अरब सोदीशी सैन्य करार केल्याने या युद्धात ओढला जातो की काय अशी स्थिती असताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक गबॉर्ड यांचे वक्तव्य समोर आले आहे. जर इराण आणि सौदी अरब यांचा संघर्ष वाढला तर पाकिस्तानला दोन आघाडीवर लढावे लागू शकते. पाककडील आंतरखंडीय क्षेपणास्रे नंतर अमेरिकेसाठी थेट धोकादायक ठरतील. पाकिस्तान त्यांचे क्षेपणास्र शाहीन – ३ ला जर आंतरखंडीय क्षेपणास्रात परिवर्तित करण्यात यशस्वी झाला असेल तर तो केवळ भारतासाठी नव्हे तर भविष्यात अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकतो असे तुलसी गबॉर्ड यांना वाटत आहे. गबॉर्ड यांनी पाकिस्तानला चीनच्या रांगेत उभे करुन आता वॉशिंग्टन इस्लामाबादच्या मिसाईल महत्वाकांक्षेला दुर्लक्ष करु शकत नाही. जर शाहीन-३ icbm मध्ये कन्व्हर्ट झाले तर जगाचा नकाशा बदलेल.त्यामुळे तुलसी यांनी सुचवले की आता पाकिस्तान केवळ शेजारी नाही तर ग्लोबल धोका बनला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in